Ticker

6/recent/ticker-posts

सौर ऊर्जा कंपनीकडून शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाचा भंग.



डी बी झेड कंपनी प्रशासन ठरलेल्या मुदतीत शेतीचे भाडे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप.

दै.लोकयुवा मानोरा :- (ता.प्र. जगदीश राठोड)

मानोरा तालुक्यातील तीर्थक्षेत्र अमरगड येथील शेतकऱ्यांची ८० एकर शेती करार पद्धतीने सौर ऊर्जा प्रकल्पासाठी घेतलेल्या डिबी झेड कंपनी प्रशासनाने शेतकऱ्यांना प्रतिवर्षीच्या ऑगस्ट महिन्यात त्यांचे भाडे दिले जाईल या वचनाला हरताळ फासून आता कागदाकडे बोट दाखवीत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण होत असून कंपनी प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा दिला आहे. 

डी बी झेड कंपनी प्रशासनाने तीर्थक्षेत्र अमरगड (वाई गौळ) येथील ८० एकर शेती शेतकऱ्यांकडून प्रति एकर ५०,०००/ रुपये या दराने करार पद्धतीने भाडेतत्त्वावर घेतली आहे व प्रत्येक शेतकऱ्याला दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेला त्यांची जेवढी शेती असेल त्याप्रमाणे भाडे दिल्या जाईल असे दलाल सोळंके यांच्यामार्फत करार करताना सांगितले होते.

कंपनी प्रशासनाने शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनानुसार अनेक शेतकऱ्यांनी व्यवहार केले असून ऑगस्ट महिन्याला कंपनीकडून पैसे मिळाल्यावर कर्ज रक्कम परत करण्याचे वचन देणेदारांना दिले होते मात्र कंपनी प्रशासनाने स्वतः दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत असल्याचे पुढे येत आहे.

डी बी झेड कंपनी प्रशासनाने ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांची भाड्याची रक्कम तातडीने चुकती करून शेतकऱ्यांना सहकार्य न केल्यास शेती दिलेले शेतकरी आंदोलनाचा पवित्रा घेतील अशी माहिती शेती दिलेल्या शेतकऱ्या पैकी एकाने प्रस्तुत प्रतिनिधीला दिली. 


Post a Comment

0 Comments