Ticker

6/recent/ticker-posts

मोस्ट वॉन्टेड आरोपी अब्बास सय्यद अखेर जेरबंद, कल्याणच्या खडकपाडा पोलिसांची मोठी कारवाई



(कल्याण)8 ॲागस्ट 2026

मुंबईसह ठाणे पोलिस ज्याला जंग जंग पछाडत होते, तो सराईत गुन्हेगार कल्याणातील खडकपाडा पोलिसांच्या हाती लागला आहे. मोठ्या शिताफीने पोलिसांनी या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या आहेत. अब्बास शाहजोर सय्यद (२५) असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुन्हेगाराचे नाव असून, त्याच्याकडून एकूण ६ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे कल्याण, ठाणे आणि मुरबाड येथील एकूण ८ गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडजवळील ९० फुटी वडवली रोडवर असलेल्या गांधारी येथून अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली होती. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरीक्षक प्रेमानाथ ढोले, पोनि मारुती आंधळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश पाटील, पोलिस उपनिरीक्षक भूषण देवरे यांच्या पथकाने तपासचक्रांना वेग दिला. या गुन्ह्याचा तपास करताना घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास व गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात अखेर या पथकाला यश आले.

Post a Comment

0 Comments