Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण हद्दीतील तीन वर्षांपूर्वी झालेल्या बॅग लिफ्टिंग गुन्ह्यातील फरार तीन आरोपी ताब्यात: ₹5,00,300/-किंमतीचा मुद्देमाल जप्त:



(स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांची उत्कृष्ट कामगिरी)

{नांदेड जिल्हा प्रतिनिधी-शेख अनिस}

नांदेड|नांदेड दि.02/08/2023 रोजी फिर्यादी प्रशांत प्रभाकर डहाळे,रा.सिडको,नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून,अज्ञात आरोपींनी त्यांच्या बॅगची चोरी (Bag Lifting) करून त्यामधील सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान ऐवज चोरून नेल्याप्रकरणी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण गु.र.नं.561/2023, कलम 379 भारतीय दंड संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास सुरू असताना यापूर्वी दोन आरोपींना अटक करून त्यांच्याकडून सुमारे ₹13,00,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.मात्र,या गुन्ह्यातील आणखी तीन आरोपी गेल्या तीन वर्षांपासून फरार होते.त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते.

मा.डॉ.नीलाभ रोहन,पोलीस अधीक्षक यांनी फरार आरोपींचा शोध घेऊन उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा,नांदेड यांना विशेष सूचना दिल्या होत्या.त्यानुसार सपोनि/रवी वाहुळे व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण,गोपनीय माहिती व विविध राज्यांमध्ये शोधमोहीम राबविली.

तपासा दरम्यान आरोपी ओडिशा राज्यातील जाजपूर परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक तेथे रवानां करण्यात आले.पुढे गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी बासर,जिल्हा निर्मल,राज्य तेलंगणा येथे आल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पथकाने तेथे सापळा रचून 1) औला गंगा औला रामुल,वय 40 वर्षे 2) कंचना दास येशु दास,वय 40 वर्षे दोन्ही रा. पुराबाकोटे,जिल्हा जाजपूर,राज्य ओडिशा 3) चिनबाबू रामू प्रधान,वय 23 वर्षे,रा. दसमनिया,जिल्हा जाजपूर,राज्य ओडिशा या तीन आरोपींना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सदर बॅग लिफ्टिंग गुन्ह्याची कबुली दिली असून,त्यांच्याकडून गुन्ह्यातील ₹5,00,300/-किंमतीचा चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामिण यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही यशस्वी कारवाई मा.डॉ.नीलाभ रोहन,पोलीस अधीक्षक,नांदेड यांच्या आदेशाने गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स.पोनि रवी वाहुळे व त्यांच्या पथकातील अधिकारी पोउपनि/माधव केंद्रे, बळीराम दासरे व पोलीस अंमलदार देविदास चव्हाण,ब्रम्हानंद लामतुरे, शेख उमर,दिलीप चंचलवार,मोतीराम पवार, सिध्दार्थ सोनसळे,महिला अंमलदार भाग्यश्री सुर्यवंशी सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा,नांदेड तसेच महिला अंमलदार प्रतिभा तरटे,उज्वला सदावर्ते सर्व नेमणुक पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण व सायबर सेल येथील रेश्मा पठाण, राजेंद्र सिटीकर,दिपीक ओढणे यांच्या संयुक्त सहभागातून पार पाडण्यात आली...

Post a Comment

0 Comments