लोक युवा न्यूज आरिफ खान पठाण प्रतिनिधी,मेळघाट, धारणी
रस्त्याची दुरवस्था; नागरिक व वाहनचालकांमध्ये संतापबारातांडा, सावलीखेडा ते सुसर्दा या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. संपूर्ण रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
विशेषतः रात्रीच्या वेळी खड्डे स्पष्ट दिसत नसल्यामुळे दुचाकीस्वार व इतर वाहनचालकांना अपघाताचा धोका वाढला आहे. या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू असते. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही. त्यामुळे वाहनांचे नुकसान होण्यासोबतच गंभीर अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संबंधित प्रशासनाने तातडीने या रस्त्याची पाहणी करून खड्डे बुजवावेत आणि रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी बारातांडा, सावलीखेडा व सुसर्दा परिसरातील नागरिकांकडून होत आहे.

0 Comments