Ticker

6/recent/ticker-posts

उपअभियंता व शाखा अभियंत्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा जिल्हाअधिकारी यांच्याकडे माणिक लोखंडे यांची मागणी



किल्ले धारूर। प्रतिनिधी

सार्वजनिक बांधकाम उपविभाग, धारूर अंतर्गत गेल्या तीन वर्षांत (२०२३ ते २०२६) झालेल्या रस्ते विकास व इतर बांधकामांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि शासकीय निधीचा अपहार झाल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. निकृष्ट दर्जाची कामे करून शासनाची फसवणूक करणाऱ्या झथऊच्या उपअभियंत्यांसह शाखा अभियंता आणि संबंधित गुत्तेदारांवर तात्काळ भारतीय न्याय संहितेनुसार फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना निलंबित करावे, अशी जोरदार मागणी भारतीय जनता पक्ष अनुसूचित जाती-जमाती विभागाचे बीड जिल्हा उपाध्यक्ष माणिक लोखंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

टेबलवर बसून एम.बी. भरल्याचा गंभीर आरोप

जिल्हाधिकारी साहेबांना पाठवलेल्या निवेदनात माणिक लोखंडे यांनी धारूर झथऊमधील कारभाराचे धिंडवडे काढले आहेत. गेल्या तीन वर्षांत मंजूर करण्यात आलेल्या ग्रामीण रस्ते, मुख्य जिल्हा मार्ग आणि इमारतींच्या दुरुस्तीच्या कामात 'डीएसआर' व मंजूर अंदाजपत्रकातील तांत्रिक निकषांना पूर्णपणे हरताळ फासण्यात आला आहे. कामाच्या ठिकाणी डांबरीकरण, खडीकरण

व साहित्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट असताना, अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी न करता केवळ टेबलवर बसून (मेझरमेंट बुक) भरले आणि काम पूर्ण होण्याआधीच कंत्राटदारांना कोट्यवधी रुपयांची देयके अदा केली, असा गंभीर आरोप निवेदनात करण्यात आला आहे. अधिकारी व गुत्तेदारांच्या आर्थिक संगनमतामुळे हा प्रकार घडल्याचे त्यांनी म्हटले आहे.


Post a Comment

0 Comments