Ticker

6/recent/ticker-posts

आर्थिक व डिजिटल साक्षरता शिबिर केदारपूर येथे उत्साहात संपन्न..



 काटोल प्रतिनिधी  :- विकास सोमकुवर 

 नाबार्ड व काटोल ना. डी. से. को. यांच्या संयुक्त विद्यमाने केदारपूर येथे आर्थिक व डिजिटल साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले. ग्रामीण नागरिकांमध्ये आर्थिक व्यवहारांची सुरक्षितता, डिजिटल पेमेंट तसेच आर्थिक फसवणुकीबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिराला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाडगाव सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष विनायकराव मानकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नंदकिशोर राजूरकर, विजयराव जाधव व मोहन पांडे उपस्थित होते.

यावेळी विजयराव जाधव यांनी डिजिटल व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, सुरक्षित ऑनलाइन व्यवहार व आर्थिक साक्षरतेचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. मोहन पांडे यांनी वाढत्या आर्थिक फसवणुकीच्या प्रकारांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक उपाययोजना तसेच अंधश्रद्धेपासून दूर राहण्याचे आवाहन केले. नंदकिशोर राजूरकर यांनीही आर्थिक शिस्त व बचतीचे महत्त्व स्पष्ट केले.

अध्यक्षीय भाषणात विनायकराव मानकर यांनी गावकऱ्यांनी सुरक्षित व पारदर्शक आर्थिक व्यवहार करावेत, तसेच डिजिटल माध्यमांचा योग्य वापर करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोसायटीचे सचिव मनीष भागवत यांनी केले, तर निळकंठराव गजभिये यांनी आभार प्रदर्शन केले.

याप्रसंगी सेवा सोसायटीचे संचालक अविनाश शेटे, ज्ञानेश्वर कोहळे, ज्ञानेश्वर राऊत, रामराव राऊत, जितेंद्र वंजारी, नामदेव क्षीरसागर, गुलाब भिंगारे, दिनेश मानकर, प्रदीप वंजारी, संदीप क्षीरसागर, सुनील शेंद्रे, संजय भलावी तसेच मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

 

Post a Comment

0 Comments