Ticker

6/recent/ticker-posts

जामनेर–बोदवड मार्गावर भीषण अपघात; एरंडोल–शेगाव बसच्या धडकेत १९ वर्षीय युवकाचा मृत्यू

 



जिल्हा प्रतिनिधी : जामनेर–बोदवड राज्य महामार्गावरील मालदाभाडी गावाजवळ गुरुवारी सकाळी भीषण अपघातात सार्थक शाळीग्राम पोकळे (वय १९) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. एरंडोल–शेगाव मार्गावरील एसटी बसच्या धडकेत हा अपघात घडला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात असलेल्या एसटी बसने सार्थक यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. धडकेनंतर दुचाकी बसच्या पुढील भागाखाली अडकली आणि बसने ती काही अंतरापर्यंत फरफटत नेल्याचे सांगितले जात आहे. या भीषण अपघातात सार्थक पोकळे यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.  मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेसाठी पाठविण्यात आला असून, अपघाताचे नेमके कारण आणि जबाबदारी निश्चित करण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

जामनेर–बोदवड मार्गावर वारंवार होणाऱ्या भीषण अपघातांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून, या रस्त्यावर तातडीने प्रभावी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. मालदाभाडी परिसरातील या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Post a Comment

0 Comments