जालना / संतराम जाधव
*जालना, दि. 10* : पोलीस अधीक्षक कार्यालय, जालना यांच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या भव्य जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आज पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडला. "नशाचे दुष्परिणाम" या विषयावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत आणि व्याख्यान स्पर्धेत बानेगाव येथील बानेश्वर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश मिळवले.
*विजेत्या विद्यार्थिनी*
या स्पर्धेत श्रुती ज्ञानेश्वर उढाण हिने प्रथम क्रमांक पटकावला, तर श्रद्धा सतीश कदम हिने द्वितीय क्रमांक मिळवला. vcv
जिल्हा पोलीस अधीक्षक तिगबीर सिंग संधु यांच्या हस्ते दोन्ही विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल संधु साहेबांनी अभिनंदन केले आणि व्यसनमुक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले.
*शाळेचे अभिनंदन*
या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मंडलिक सर, शिक्षक वृंद आणि पालकांचे अभिनंदन करण्यात आले.
*उद्देश*
तरुण पिढीला व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती. जिल्ह्यातील विविध शाळांमधून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.

0 Comments