*बिलोली तालुक्यातील येसगी येथील रेती घाटावरील उत्खननाबाबत ग्रामीन युवा पत्रकार संघाचा इशारा; लवकरच एसडीएम व तहसीलदारांना निवेदन देणार..!*
बिलोली प्रतिनिधी विनोद वाघमारे
बिलोली तालुक्यातील मौजे येसगी, येथील रेती उत्खनन व वाहतुकी बाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघ, बिलोलीच्या वतीने बिलोली तहसिल कार्यालय व एसडीएम कार्यालयाचे लक्ष वेधण्यासाठी युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने लवकरच उपविभागीय अधिकारी (एसडीएम) व तहसीलदार, बिलोली यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे..
येसगी येथिल रेती घाटात दिवस रात्र अवैध उत्खनन व अवैध वाहतुकीचा नगा नाच गेल्या महिण्यापासून चालु असून बिलोली तहसिल परशासनाने अर्थपुर्ण दुर्लक्ष करित असल्याचे दिसुन येत आहे.येसगी येरथिल घाटात परवानगीच्या नावाखाली शासनाने दिलेल्या शर्ती, व अटींचे पालन करुण उत्खनन करण्या ऐवजी नियमाची पायमल्ली होत आहे तरी महसुल प्रशासनास दिसत नाही ना पोलीस प्रशासनाला दिसत नाही का?, असा सवाल खडा होत आहे.
यादव पिराजी प्रचंड याच्या नावाने देण्यात आलेल्या परवानगीच्या नावाखाली महाराष्ट्र, तेलगणा,कर्णाटकात बेसुमार अवैध वाहतुक जोरदार पणे चालु असुन देथिल महसूल प्रशासन मुग गिळून गप् बसले आहे.
यामुळे होणाऱ्या या लुटीची सखोल चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. दिवस-रात्र मोठ्या प्रमाणात रेती उत्खनन, साठवणूक आणि हायवा वाहनांद्वारे वाहतूक सुरू असल्याचे निर्दशनास येत आहे. विषेय म्हणजे अधिकृत मार्गाऐवजी पर्यायी कच्च्या रस्त्यांचा वापर करून वाहतूक होत असल्याचाही आरोप नाही तर खात्रीशीर छायाचित्रे काडण्यात आले आहेत...या प्रकरणात घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी, ड्रोनद्वारे रेती साठ्याचे मोजमाप, महसूल, भूमापन व खनिकर्म विभागाच्या संयुक्त पथकाकडून चौकशी, तसेच आवश्यक असल्यास सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून सत्य परिस्थिती समोर आणण्याची मागणी पत्रकार सघाच्या निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.
निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाने स्पष्ट केले की, जनहित, पर्यावरण संरक्षण आणि शासनाच्या महसुलाचे रक्षण व्हावे, या उद्देशाने ही मागणी करण्यात येत असून, नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

0 Comments