Ticker

6/recent/ticker-posts

तपणी गावाची सेंद्रिय कापूस (RCS) प्रकल्पासाठी निवड; शेतकऱ्यांची नोंदणी सुरू..!



काटोल प्रतिनिधी :- विकास सोमकुवर 

 ॲग्रीजेनिक फार्मर प्रोडूसर कंपनी, काटोल यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सेंद्रिय कापूस (RCS) प्रकल्पासाठी तपणी गावाची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांतर्गत तपणी येथील शेतकऱ्यांची नोंदणी (रजिस्ट्रेशन) करण्यात आली.

यावेळी शेतकऱ्यांना सेंद्रिय कापूस शेतीचे महत्त्व, RCS प्रकल्पाचे उद्दिष्ट, सेंद्रिय पद्धतीने शेती केल्याने होणारे फायदे, तसेच भविष्यात दर्जेदार उत्पादन व बाजारपेठेतील संधी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सेंद्रिय शेतीमुळे उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासोबतच पर्यावरण संवर्धन आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसही चालना मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या प्रसंगी मा. सरपंच नितीनजी गजभिये, ॲग्रीगजेनिक कंपनीचे ICS मॅनेजर अतुल सर, शंतनू सर, फिल्ड ऑफिसर तथा सामाजिक कार्यकर्ते विकास सोमकुवर, कंपनीचे पदाधिकारी व कर्मचारी तसेच तपणी गावातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रकल्पाच्या माध्यमातून तपणी गावातील अधिकाधिक शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीचा अवलंब करून शाश्वत शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन कंपनीच्या प्रतिनिधींनी यावेळी केले.

Post a Comment

0 Comments