प्रतिनिधी . सागर काळे
बीड .संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना कथित जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या घटनेचा मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे. संबंधित व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
मराठा समाजाच्या निवेदनानुसार, मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवांच्या भावना आणि नेतृत्वाचे प्रतीक आहेत. अशा नेतृत्वाला धमकी देण्याचा प्रकार अत्यंत गंभीर असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये आणि त्यांना आवश्यक ती सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला कोणत्याही प्रकारच्या धमक्यांनी खिळ बसणार नाही. कायद्यांचे राज्य अबाधित ठेवत या प्रकरणातील सत्य समोर आणावे आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे.
मुख्य मागण्या
धमकी देणान्यावर तातडीने कारवाईसंबंधित व्यकीचा तातडीने शोध घेऊन त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.सुरक्षेत वाढमनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत कोणतीही त्रुटी राहू नये.निष्पक्ष चौकशीया प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.मराठा समाजाचा इशारायापुढे कोणतीही अनुचित घटना घडल्यास संबंधित प्रशासनावर संपूर्ण जबाबदारी राहील.

0 Comments