(नांदेड जिल्हा प्रतिनिधी-शेख अनिस)
नांदेड|नांदेड महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,नांदेड विभागामार्फत सन 2026–27या द्वितीय सत्रासाठी विविध व्यवसायांमध्ये 1वर्ष कालावधीसाठी शिकाऊ उमेदवार (Apprentice Trainee) भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.ही भरती ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार असून एकूण 110 पदे भरण्यात येणार आहेत. व्यवसायनिहाय पदसंख्या पुढीलप्रमाणे आहे.
मेकॅनिक मोटार व्हेईकल -40,मेकॅनिक डिझेल -44, शीट मेटल वर्क्स–08,ऑटो इलेक्ट्रिशियन–05, मेकॅनिक रेफ्रिजरेशन अँड एअर कंडीशनर–02,पेंटर (जनरल)–03,वेल्डर (गॅस अँड इलेक्ट्रिक)–06,टर्नर–02 तसेच अभियांत्रिकी पदवी/पदविका–02अशी एकूण 150 पदे आहेत.अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती व दिव्यांग उमेदवारांसाठी शिकाऊ उमेदवार कायद्यानुसार जागा आरक्षित राहतील.
आय.टी.आय.किंवा व्होकेशनल अभ्यासक्रम तसेच ऑटो इंजिनिअरिंग टेक्निशियन अभ्यासक्रम उत्तीर्ण उमेदवारांनी प्रथम www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर स्वतःचे नोंदणीकरण करणे आवश्यक आहे.MSRTC Division Nanded या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा.
त्यानंतर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विहित नमुन्यातील छापील अर्ज भरून सादर करणे आवश्यक आहे.विहित नमुन्यातील छापील अर्ज आस्थापना शाखा,विभाग नियंत्रक यांचे कार्यालय, असदुल्लाखान टेकडी, रिजनल वर्कशाप समोर, नांदेड येथे दिनांक 8 जुलै ते 28 जुलै 2026 या कालावधीत (शनिवार, रविवार व सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उपलब्ध राहतील व तात्काळ स्वीकारले जातील.
छापील अर्जाची किंमत (जीएसटी सह) खुल्या प्रवर्गासाठी 590 रुपये असून मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांनी वैध जातीचे प्रमाणपत्र सादर केल्यास 295 रुपये इतकी राहील.इच्छुक व पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन रा.प.महामंडळ नांदेड विभागामार्फत करण्यात आले आहे..!

0 Comments