दर्यापूर ग्रामीण प्रतिनिधी दिपक मेश्राम
दर्यापूर: येथील अयोध्या नगर परिसरामध्ये पर्यावरण संतुलनाचा संदेश देत उत्साहात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. पावसाळ्याचे औचित्य साधून परिसरातील नागरिकांनी एकत्र येत विविध वृक्षांची लागवड केली व त्यांच्या संगोपनाची जबाबदारी घेतली.
याप्रसंगी शरदभाऊ सहगल, दीपक मेश्राम, देवेंद्र आपोतिकार, हरिभाऊ पवार, अंजली सहगल, पूर्वा मेश्राम, नित्याश मेश्राम, सौ. तेजस्विनी मेश्राम, सौ.ज्योतीताई सहगल आणि येवले काका प्रामुख्याने उपस्थित होते.
"केवळ वृक्ष लावणे पुरेसे नसून, ते जगवणे ही काळाची गरज आहे," अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली. परिसरातील इतर नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

0 Comments