Ticker

6/recent/ticker-posts

पोकळवडगावात भाजप किसान मोर्चा व KVK च्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक शेती कार्यशाळा; शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग



जालना/ संतराम जाधव 

पोकळवडगाव,  शेतकऱ्यांना रासायनिक शेतीच्या विळख्यातून बाहेर काढून नैसर्गिक शेतीकडे वळवण्यासाठी भाजप किसान मोर्चा जालना व कृषी विज्ञान केंद्र (KVK) जालना यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथे 'नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रम' मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी *श्री. गहीनीनाथ कापसे* होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ व KVK प्रमुख *श्री. एस.व्ही. सोनुने* व तालुका कृषी अधिकारी *श्री. व्ही.जे. राठोड* यांनी शेतकऱ्यांना जीवामृत, दशपर्णी अर्क, घनजीवामृत तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष *श्री. राजेश मोरे* यांनी केंद्र सरकारच्या नैसर्गिक शेती धोरणाची व अनुदान योजनांची सविस्तर माहिती दिली. प्रदेश कार्यकारिणी सदस्य *श्री. अंकुशराव बोबडे*, जिल्हाध्यक्ष *श्री. ज्ञानेश्वर शेजुळ*, तालुकाध्यक्ष *संजय आवटे*, सोशल मीडिया प्रमुख *सदाशिव यादव*, जिल्हा सरचिटणीस *राजेश राठोड* यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मावली चव्हाण, गणेश गुजर, विष्णू गोरे, सरपंच पोकळवडगाव, उपसरपंच पुणेगाव, कृषी सहाय्यक व परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्याचा संकल्प केला

Post a Comment

0 Comments