Ticker

6/recent/ticker-posts

संतोष देशमुख हत्या प्रकरणात फोन करणाऱ्यांचे सीडीआर तपासा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी

 संतोष देशमुख हत्या प्रकरणात फोन करणाऱ्यांचे सीडीआर तपासा बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांची मागणी

Inbox

Summarize this email


Sagar Kale

Tue, Jun 30, 6:11 PM (18 hours ago)

to me


It looks like this message is in Marathi







जिल्हा .प्रतिनिधी .सागर काळे 

केज : स्व. विलास घुले हत्या प्रकरणी आमचा दूरचा देखील सबंध नसताना आमच्यावर आरोप होत आहेत. जसे आमचे सीडीआर तपासले जात आहे. तसाच पोलिसांनी स्व. संतोष देखमुख हत्या प्रकरणात पोलिसांना फोन करणारे आणि आरोपींना सोडण्यासाठी गाडी पुरवणारे व साहित्य पुरवणारे हे आरोप करीत आहेत. या सर्वांची चौकशी करून त्यांना आरोपी करायला पाहिजे, अशी मागणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.

विलास घुले खून प्रकरणी बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे यांचा उल्लेख फिर्यादीने पुरवणी जबाबात केल्याने त्याची चर्चा सुरू असताना, माध्यमांशी बोलताना खा. सोनवणे म्हणाले की, या प्रकाराचा तपास सहाय्यक पोलिस अधीक्षक वेंकटराम हे प्रमुख असलेले एसआयटी करीत आहे. त्या एसआयटीवर आणि सरकारवर देखील भरोसा असल्याच्या ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. मात्र या प्रकरणाशी दुरान्वयानेही संबंध नसताना आमच्यावर आरोप होत आहेत. जसे आमची चौकशी करण्यात येत आहे, तशीच चौकशी स्व. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील गुन्हेगारांशी संबंधित असलेले, त्याच्याशी संपर्कात असलेले आणि त्यांना साहित्य पुरवठा करून त्यांची सेवा करणाऱ्याचे देखील पोलिसांनी सीडीआर तपासून चौकशी करावी. एका महिलेवर झालेल्या लैंगिक अत्याचारा संदर्भात गुन्हेगारांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या गुन्हेगारावर गुन्हे दाखल करून त्यांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. जर बदनामी थांबविली नाही तर न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्याचे देखील त्यांनी सुतोवाच केले. काहीजण हे त्यांचे पाप झाकण्यासाठी आमच्यावर आरोप केले जात असल्याचे त्यांनी सांगत त्यांना घाणीत हात घालून तोंड काळे करून घ्यायची ज्यांना सवय आहे त्यांनी खुशाल तसे करावे असे कुणाचेही नाव न घेता खा. बजरंग सोनवणे म्हणाले.

सध्या बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले खून प्रकरण गाजत आहे. याप्रकरणातआतापर्यंत १० जणांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलांचे सौरभसोनवने याचे नाव पुढे आल्यानंतर बीड जिल्ह्यातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली होती.


Post a Comment

0 Comments