धारूर प्रतिनिधी /चेतन लोखंडे
किल्ले धारूर शहरातील नगरपरिषद अंतर्गत शहरात पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून गेल्या तब्बल २० दिवसांपासून नागरिकांच्या घरातील नळ कोरडे आहेत. शहरात पाण्याचे तलाव अनेक असून त्याठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी करोडो रुपयांचा देखील खर्च करण्यात आला असला तरी आज नीतीला शहराला १५ ते २० दिवसापासून पाणी नाही. केलेला करोड रुपयांचा खर्च पाण्यात आणि नागरिकांचा
घसा कोरडा झाल्याचे चित्र दिसत आहे. असताना ही नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी अक्षरशः भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे शहरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी नागरिकांना रोज संघर्ष करावा लागत आहे. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना पाण्याच्या एका हंड्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असून अनेकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे
नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तलाव अनेक... पण पाण्याचा थेंबही नाही! अशी संतप्त प्रतिक्रिया शहरवासीयांकडून व्यक्त होत आहे. कर भरूनही वेळेवर पाणी मिळत नसल्याने नागरिक प्रशासनाला जाब विचारत आहेत. इतके दिवस पाणीपुरवठा का ठप्प आहे, त्याला जबाबदार कोण, आणि त्यावर तातडीने उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नागरिकांची तातडीने मागणी नियमित पाणीपुरवठा
नगर परिषदका सुरू करावा, पाणीटंचाईची कारणे जाहीर करावीत आणि या हलगर्जीपणासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशाराही शहरातील काही नागरिकांनी दिला आहे. दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाकडून याबाबत काय भूमिका घेतली जाते आणि पाणीपुरवठा कधी सुरू होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
नागरिकांची हाक ! उन्हाळ्यात नाही किमान पावसाळ्यात तरी द्या पाणी
शहरातील नागरिकांना गेल्या अनेक दिवसांपासून नळाद्वारे पाणीपुरवठा होत नसल्याने तीव्र गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पावसाळा सुरू असूनही नळ कोरडेच असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण झाले आहे व प्रश्न उपस्थित केले आहेत

0 Comments