बोळेगाव गावातील नागरीकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या कुटुंबातील माहिती अचुक द्यावी.-बिएलऒ बालाजी अर्धापुरे
बिलोली प्रतीनीधी विनोद वाघमारे
बिलोली तालुक्यातील मौजे बोळेगावात मतदान यादी विषेश सखोल पुनरीक्षनला उस्फुर्त प्रतिसाद भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघात मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी ३० जून ते २९ जुलै या कालावधीत 'मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण' अभियान राबविण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) घराघरात भेट देऊन प्रत्येक मतदाराचा ईएफ फॉर्म भरून घेणार असून, नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे व माहिती तयार ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी केले आहे. या मोहिमेदरम्यान प्रत्येक पात्र मतदाराचा ईएफ फॉर्म भरला जाणार असून त्यास दोन पासपोर्ट आकाराचे छायाचित्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच फॉर्मवर संबंधित मतदाराची किंवा कुटुंबातील प्रौढ सदस्याची स्वाक्षरी अथवा अंगठ्याचा ठसा आवश्यक राहणार आहे.
फॉर्मची एक प्रत मतदाराकडे राहील, तर दुसरी प्रत बीएलओंकडे जमा करण्यात येईल. ४० वर्षांवरील मतदारांनी सन २००२ च्या मतदार यादीतील स्वतःचा भाग क्रमांक व अनुक्रमांक उपलब्ध करून द्यावा. तर ४० वर्षांखालील मतदारांनी आई, वडील, आजी किंवा आजोबा यांपैकी कोणत्याही एका व्यक्तीचा सन २००२ च्या मतदार यादीतील भाग क्रमांक व अनुक्रमांक सांगणे आवश्यक आहे. विवाहित महिलांनी माहेरच्या कुटुंबाची संबंधित माहिती अचूकपणे द्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बाहेरगावी वास्तव्यास असलेल्या मतदारांनी दोन पासपोर्ट फोटो व आवश्यक माहिती आगाऊ आपल्या कुटुंबीयांकडे पाठवून ठेवावी, बीएलओ घरी भेट दिल्यानंतर कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या विशेष पुनरीक्षण मोहिमेत सर्व पात्र मतदारांनी ईएफ फॉर्म वेळेत भरून द्यावा. त्यामुळे कोणत्याही नागरिकाने ही प्रक्रिया दुर्लक्षित करू नये व बीएलओंना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.यावेळी बोळेगाव तलाठी सज्जाचे तलाठी चंद्रकांत चौडगे ग्रामसेवक बैलके बिएलओ बालाजी अर्धापुरे , ग्रामपंचायत सदस्य गोणेकर व्यंकट, पत्रकार मारोती शिंत्रे ,आशा वर्कर अनिता बसवते,आदी उपस्थित राहुन सहभाग घेतला होता.

0 Comments