वैजापूर प्रतिनिधी अर्जुन शिंदे.
वैजापूर तालुक्यातील शिऊर–जिरी रस्त्याचे काम सुमारे सहा महिन्यांपूर्वी पूर्ण झाले असले, तरी बळ्हेगाव येथील चौफुलीवरील फरशीचे काम अपुरे राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
चौफुलीवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने परिसरात डासांची उत्पत्ती वाढली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या मार्गावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
पावसाचे पाणी रस्त्यावर साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. परिणामी या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांना दररोज साचलेल्या पाण्यातून मार्ग काढावा लागत असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.
याबाबत ग्रामस्थांनी प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेऊन चौफुलीवरील अपूर्ण फरशीचे काम पूर्ण करावे, तसेच साचलेल्या पाण्याचा कायमस्वरूपी निचरा करण्यासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या समस्येवर तात्काळ कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे.

0 Comments