केंद्रीय व राज्य सरकार कडून राबविण्यात येत असलेल्या (SIR) मतदार यादीची सखोलपणे पडताळणी योजनेला आणखी ३० दिवस मुदत वाढवून देण्यांत यावे आणी मतदार यादीत बोगस नांव बाबतीत कडक कारवाई करण्यात यावी- अविनाश देशमुख सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस
बदलापूर प्रतिनिधी: भारत सरकारच्या माध्यमातून राज्यांमध्ये एस आय आर मतदार यादीची सखोल पडताळणीची योजना राज्यामध्ये राबवण्यात येत आहे महाराष्ट्र मध्ये काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी गेल्या काही दिवसापासून होत आहे या अतिवृष्टीच्या काळामध्ये आपण नेमलेले बीएलओ यांच्या माध्यमातून शंभर टक्के हे काम झालेले नाही असं निदर्शनात येत आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदार याद्यांमध्ये घोळ आहे बोगस नाव मतदार यादी मध्ये घुसवण्यात आलेले आहेत याची सुद्धा आपणाच्या माध्यमातून दखल घेणे अतिशय महत्त्वाचे आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपणास एवढेच म्हणणे आहे की एसआय आर मतदार यादीची सखोल पडताळणीची योजनेमध्ये आपण नेमलेल्या कर्मचाऱ्यांना वाढीव एक महिना देण्यात यावा जेणेकरून गेल्या आठवड्यापासून ठाणें जिल्ह्यातील बदलापूर सहित सर्वच भागांत अतिवृष्टीमुळे आपन नेमलेले बीएलओ कडुन लोकांपर्यंत पोहचने अडचणींचे झालें आहे, एका बीएलओ मागे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार १४००ते १५०० मतदाराची जबाबदारी दिलेली आहे अशा परिस्थितीमध्ये कर्मचारी आणि बीएलओ यांची संख्या फार तुल्यबळ आहे एवढ्या कमी अवधीमध्ये बदलापूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये मतदार पुनरावलोकन होणं फार जिकरीचे झालेले आहे अशा घाईगडबडी मध्ये एकूण २९ जुलै ही डेडलाईन देण्यात आलेली आहे अशा अल्पावधीत मध्ये कित्येक लोकांचं मतदान पुनरावलोकन होणार नाही किंवा सर्वेक्षण होणार नाही हजारो लाखो लोक बदलापूरचे आणि ग्रामीण भागातील मतदार यादीतून पासून वंचित राहण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आमचं म्हणणं असं आहे की २९जुलै ही डेडलाईन वाढवून पुढचे ३५ ते ४०दिवस वाढवून देण्यात यावे अशी आमची मागणी आहे जेणेकरून बदलापूर शहर आणि ग्रामीण भागातील आपण राबवत असलेल्या (एस आर आर) म्हणजे मतदान यादीतील पुनर् सर्वेक्षणाचा फायदा हा जनसामान्यापर्यंत होऊ शकतो तसेच राष्ट्रवादी काँग्रेस कडून केरळ कर्नाटक आणि बंगालच्या धरतीवरती लाखो मतदान करते आपल्या याद्यातून वगळण्याचे कटकारस्थान भाजप च्या माध्यमातून झालेलं आहे अशाच धरतीवरती महाराष्ट्रात सुद्धा केंद्र सरकार आणि आरएसएस च्या माध्यमातून असं कटकारस्थान राबवण्यात येत असल्याचा शंका आमच्या मनात निर्माण झालेली आहे डी एम्प्लिमेंटच्या नावाखाली महिला आरक्षणाच्या बूरख्या आड आरएसएस किंवा भाजप लोकसभेतील जागा वाढवून पुन्हा आपला सत्तेचा मार्ग सुकर करण्यासाठी ही सत्तेचा दुरुपयोग करून सत्ता पुन्हा स्थापित करण्यासाठी हा मार्ग अवलंब आहे असे आरोप केले आहे

0 Comments