एक दिवस बाजार बंद करून आंदोलनाचा इशारा
घनसावंगी / संतराम जाधव
*घनसावंगी, दि. 9* : घनसावंगी शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याबाबत पोलीस प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप करत व्यापारी महासंघाने पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहरात रोज एक-दोन दुकाने फोडण्याच्या घटना घडत आहेत. तरीही पोलीस प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही. दिनांक 8 जुलैच्या रात्री तब्बल चार ते पाच दुकाने फोडण्यात आली.
पोलीस प्रशासनाने या चोरींचा तपास न केल्यास व्यापारी महासंघाच्या वतीने एक दिवस बाजार बंद करून पोलीस प्रशासनाच्या विरोधात निषेध करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.निवेदनावर पोलीस ठाणे अंमलदारांची 9 जुलै 2026 ची पोच देखील आहे.

0 Comments