Ticker

6/recent/ticker-posts

चिखलीत वाहतूक नियमांचा बोजवारा



अपघातांच्या घटनांत वाढ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण चिखली, प्रतिनिधी: विनोद इंगळे 

चिखली

शहर व परिसरात वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असून, यामुळे अपघातांच्या घटनांत लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र समोर येत आहे. बेसिस्त वाहनचालक, अनधिकृत पार्किंग आणि वाहतूक पोलिसांची मर्यादित उपस्थिती यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीती व नाराजी व्यक्त होत आहे.

शहरातील प्रमुख रस्ते, Dp रोड. जयस्तंभ चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि बाजारपेठ परिसरात राँग साईडने वाहन उभी करणे तसेच दुचाकींवर तिघे प्रवास करणे (ट्रिपल सीट) यांसारखे प्रकार सर्रास घडताना दिसत आहेत.

🚧 अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडी

चिखलीतील मुख्य रस्त्यांवर ट्रक, टेम्पो आणि इतर मोठी वाहने रस्त्यावरच पार्क केली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. विशेषतःसकाळी व संध्याकाळी ऑफिसच्या वेळेत परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते. यामुळे रुग्णवाहिका आणि अत्यावश्यक सेवांनाही अडथळा निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे..


Post a Comment

0 Comments