Ticker

6/recent/ticker-posts

डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिन माहूर येथे श्रद्धापूर्वक साजरा



श्रीक्षेत्र माहूर (अपील बेलखोडे)

भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष, प्रखर राष्ट्रवादी विचारवंत, कुशल प्रशासक तसेच देशाच्या एकता व अखंडतेसाठी सर्वोच्च बलिदान देणारे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या बलिदान दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी, माहूर मंडळाच्या वतीने भाजपा कार्यालय, माहूर येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या राष्ट्रनिष्ठ विचारांचा, भारतीय जनसंघाच्या स्थापनेपासून राष्ट्रहितासाठी केलेल्या कार्याचा तसेच देशाच्या अखंडतेसाठी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन राष्ट्रसेवेसाठी कार्य करण्याचा संकल्पही उपस्थितांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष निळकंठ मस्के, जिल्हा उपाध्यक्ष कांतराव घोडेकर, शहराध्यक्ष गोपू महामुने, विलास चौधरी, अपील बेलखोडे, शामराव कुमरे, पवन चव्हाण, कैलास फड, रामकृष्ण केंद्रे, महिला शहराध्यक्ष स्वातीताई आडे तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे वातावरण राष्ट्रभक्तीपर घोषणांनी व डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या विचारांच्या स्मरणाने भारावून गेले. शेवटी उपस्थितांनी त्यांच्या राष्ट्रभक्ती, त्याग आणि समर्पणाच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला.


कार्यक्रमात मार्गदर्शन करताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कांतराव घोडेकर यांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेतला. देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय अस्मितेच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे सांगत, त्यांचे राष्ट्रवादी विचार आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देणारे आहेत. त्यांच्या आदर्शांचा वारसा जपत राष्ट्रहितासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले.

Post a Comment

0 Comments