Ticker

6/recent/ticker-posts

नंदुरबार येथील MKD महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून पैशांची लुटमार ;बिरसा फायटर्स आक्रमक!



जिल्हाधिकारी नंदुरबार यांना बिरसा फायटर्स़चे निवेदन; कारवाईची मागणी!

धड़गांव ता. प्रतिनिधी वसंत पावरा :-

       नंदुरबार येथील MKD  महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून पैशांची लूटमार करणा-या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कडक कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

               निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार येथील MKD महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून ५०० रूपये ऐवजी १००० रूपये शुल्क घेऊन संबंधित कर्मचारी आर्थिक लुटमार करीत आहेत. शिवाय पैसे घेतल्याची पोहच पावती दिली जात नाही. प्रवेश शुल्कच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून १ लाख ते ५० हजार रुपये घेतले जातात.त्याची पावती दिली जात नाही. याबाबत विचारणा करणा-या विद्यार्थ्यांना परिक्षेत नापास करण्याची धमकी दिली जाते.हा एक गंभीर प्रकार आहे.तसा सोशल मिडियावर विडीओ वायरल होत आहे. नंदुरबार या आदिवासी बहुल जिल्ह्यात बहूतेक विद्यार्थी हे आदिवासी व गरीब, सामान्य घराण्यातील असतात.ते जेमतेम पैसे जमवून आपलं शिक्षण करत असतात. बहूतेक विद्यार्थी पालकांची गरीब व हलाखीची परिस्थिती आहे.अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांकडून शिक्षणाच्या नावाखाली आर्थिक लुटमार करणं,हे निंदनीय आहे.तरी नंदुरबार येथील MKD महाविद्यालयात विद्यार्थ्यांकडून पैशांची लुटमार करणा-या  कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments