Ticker

6/recent/ticker-posts

विद्यालयाचा निकाल 98.47%


 

जवाहर विद्यालयाची कु.राधिका रामेश्वरराव खिस्ते एस.एस.सी.परीक्षेत 98.40% गुण घेऊन जिंतूर तालुक्यातून प्रथम*

      एस.एस.सी परीक्षा फेब्रुवारी 2026 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात जवाहर विद्यालयाची कु.राधिका रामेश्वरराव खिस्ते  98.40% गुण घेऊन जिंतूर तालुक्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर जवाहर विद्यालयाचा निकाल 98.47% असा निकाल प्राप्त झाला असून यात 90% पेक्षा जास्त 54 विद्यार्थी, 75% पेक्षा जास्त 178 विद्यार्थी, विशेष प्राविण्यप्राप्त 232 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 193 विद्यार्थी द्वितीय श्रेणी 73  असे एकूण 518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

      या निकालात कु.राधिका खिस्ते  98.40% प्रथम, द्वितीय कु.पुनम बल्लाळ  98.00%, तृतीय कु.श्रावस्ती लाटे 97.40%, कु.सुचिता राऊत  97.40%, चतुर्थ यज्ञेश घुगे  97.00%, पाचवा सुरेश पोटफाडे व इतर 512 विद्यार्थी विविध श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 

90% पेक्षा जास्त 54 विद्यार्थी, 75% पेक्षा 178 विद्यार्थी, विशेष प्राविण्य प्राप्त 232 विद्यार्थी, प्रथम श्रेणीत 193 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 73 विद्यार्थी उत्तीर्ण असे एकूण 518 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

       या यशाबद्दल संस्थेचे सचिव तथा विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी खंडेराव वटाणे, प्राचार्य बळीराम वटाणे,संचालक किशनराव वटाणे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मते, राजेश वटाणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

      इ.10 वी च्या विद्यार्थ्यांना सेवानिवृत्त पर्यवेक्षक संतोष इंगळे देवानंद वेंडोले, वसंतराव आदमाणे,कल्याण भोसले, पंडित कवडे, प्रदीप महाजन, कुंडलिक थोरात, सुभाष अवसरमोल, हरिपाल बानकर, मुंजाभाऊ मोरे, सुभाष लांडगे, गोविंद कदम यांनी मार्गदर्शन केले.

Post a Comment

0 Comments