{नांदेड जिल्हा प्रतिनिधी-शेख अनिस}
◦•●◉✿ दैनिक लोकयुवा ◦•●◉✿
नांदेड-मा.श्री.डॉ नोलाभ रोहन,पोलीस अधीक्षक नांदेड यांनी श्री अतुल भोसले पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.नांदेड यांना माली गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघड करणे वाबत आदेशीत केले होते,
त्यावरून पोलीस निरीक्षक स्था.गु.शा नांदेड यांनी स्था.गु.शा.येथील पोउपनि साईनाथ पुयड व त्यांचे पथकातील अंमलदार यांना वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते.
त्यावरून दिनांक 26/06/2026 रोजी पोउपनि साईनाथ पुयड व त्यांचे पथकातील अंमलदार हे नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण चौक बायपास रोड परीसरात असतांना त्यांना मिळालेल्या गोपनिय बातमीच्या आधारे त्यांनी बोंडारकडे जाणाऱ्या रोडवर इरफान यांचे टायर वर्क्स दुकाना जवळ सापळा रचुन छापा मारला असता दोन इंसम नामे 1) शेख रेहान ऊर्फ चिल्ला शेख महेबुब वय 21 वर्ष व्यवसाय मजुरी रा मिलतनगर गल्लीनंबर 3 नांदेड 2) मोहम्मद रेहान ऊर्फ रिझवान ऊर्फ पुष्पा मोहम्मद ईलियास वय 20 वर्ष व्यवसाय मजुरी रा.मिलतनगर गली नंबर 7 नांदेड ता.जि नांदेड यांच्या अंगझडतीतध्ये सोन्या-चांदीचे दागिने व नगदी रकमेच्या मुद्देमाला सह मिळून आल्याने त्यांना विश्वासात घेवून अधिक विचारपुस केली असता त्यांनी त्याच्या ईतर एका साधिदारासह काही दिवसापुर्वी मेहबुबनगर व ओमकारेश्वर नगर असे दोन ठिकाणी बंद घराचे कडी कोंडा तोडुन घरातील कपाटा मधील सोन्या-चांदीचे दागिने व नगदी रुपये चोरी केले होते व दोन्ही ठिकाणचे चोरी केलेले सोने चांदी चे दागिने आम्ही आज रोजी विक्री करुन पैसा आपसात वाटून घेणार होतो असे सागुन वरोल दोन्ही ठिकाणी घरफोडी केल्याची कबुलीं दिल्याने नमुद दोन्ही आरोपीतांना अटक करून मुद्देमालासह पुढील तपास कामी पोलीस स्टेशन विमानतळ यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
कामगिरी करणारे
श्री.अतुल भोसले,पोलीस निरीक्षक,स्थानिक गुन्हे शाखा,नांदेड.श्री.साईनाथ पुयड,पोलीस उप निरीक्षक, स्था.गु,शा.नांदेड.
स्था.गु.शा.नांदेड येथील पो. कॉ/ईम्रान शेख,प्रमोद जोंधळे,बालाजी कदम, संदीप घोगरे,संतोष बेल्लुरोड,महेश बडगु, पोहेकॉ गोविंद येईलवाड, उमर शेख,सायबर सेल येथील पोहेकॉ राज् सिटीकर,दिपक ओढणे,
अधिकारी व अंमलदार यांचे मा.पोलीस अधीक्षक साहेब,नांदेड यांनी कौतुक केले आहे...!

0 Comments