(3लाख 88 हजारांहून अधिक बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट;यंत्रणा सज्ज,प्रशासनाचे नागरिकांना आवाहन)
{नांदेड जिल्हा प्रतिनिधी-शेख अनिस}
✦✧✧ दैनिक लोकयुवा ✧✧✦
नांदेड-नांदेड जिल्ह्यातील एकही बालक पोलिओच्या डोसपासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभाग संपूर्ण ताकदीनिशी सज्ज झाले आहे.आगामी 28 जून 2026 रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम अत्यंत व्यापक पातळीवर राबविली जाणार आहे.
जिल्हाधिकारी राहुल कर्डिले,आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय पेरके व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष सूर्यवंशी यांच्या अचूक आणि चोख नियोजनाने या महामोहिमेची संपूर्ण पूर्वतयारी पूर्ण झाली आहे.माता बाल संगोपन अधिकारी डॉ.संतोष नवले व निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.बुटे यांच्यासह आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.
मोहिमेचे 'मिशन 3.88 लाख'आणि मायक्रो प्लॅनिंग
आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या उद्दिष्टानुसार, जिल्ह्यात एकूण 3,88,526 बालकांना पोलिओचा डोस पाजण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.याचे सविस्तर नियोजन खालीलप्रमाणे आहे:
| विभाग | अपेक्षित लाभार्थी (बालके) | पोलिओ बूथ संख्या
| ग्रामीण भाग |2,48,728| 2,283 |
| शहरी भाग |46,943 |275 |
| महानगरपालिका क्षेत्र |92,855 |285|
| एकूण |3,88,526| 2,843|
लसीकरणाचे तगडे जाळे: एकूण मनुष्यबळ:7,431 कर्मचारी आणि 643 पर्यवेक्षक (Supervisors) तैनात गृहभेट मोहीम (IPPI): मोहिमेनंतर 7,55,379 घरांना प्रत्यक्ष भेट देण्यासाठी 1,415टीम्स सज्ज.
ट्रान्झिट टीम्स: रेल्वे स्टेशन,बस स्थानके आणि चेकपोस्टवर प्रवासातील बालकांसाठी 277 टीम्स लक्ष ठेवणार.
मोबाईल टीम्स:दुर्गम भाग,वीटभट्ट्या आणि स्थलांतरित नागरिकांच्या मुलांसाठी 187मोबाईल टीम्स कार्यरत असणार.
पोलिओ मोहिमेला मिळणार लोक चळवळीचे' स्वरूप!
या मोहिमेला केवळ शासकीय कार्यक्रम न ठेवता लोक चळवळीचे स्वरूप दिले जाईल.जिल्ह्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात भिंतीपत्रके,दवंडी,सोशल मीडिया आणि मेळाव्यांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवली जात आहे." डॉ.संतोष सूर्यवंशी,जिल्हा आरोग्य अधिकारी,
एकही बालक सुटणार नाही-प्रशासनाचे निर्देश
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व यंत्रणांना परस्परांमध्ये समन्वय ठेवून सूक्ष्म आराखड्यानुसार काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.प्रवासात असणारे एकही बालक डोसपासून वंचित राहणार नाही,याची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना ट्रान्झिट टीम्सना दिल्या आहेत.पालकांना नम्र आवाहन:
जिल्ह्यातील सर्व माता-पित्यांनी आपल्या 0 ते 5 वर्षांपर्यंतच्या बालकांना 28 जून रोजी आपल्या जवळच्या पोलिओ बूथवर नेऊन आवर्जून डोस पाजावा आणि या राष्ट्रीय मोहिमेत आपले योगदान नोंदवावे."डॉ.संतोष नवले,माता बाल संगोपन अधिकारी नांदेड..!

0 Comments