श्रीक्षेञ माहूर (अपील बेलखोडे)
श्री दत्त मठ संस्थान, ब्रम्हपुरी झटाळा फाटा ( तरोडा ) येथे मागील महिण्याभरापासून सुरू असलेल्या अखंड दत्तनाम व अन्नदान महापूजा सोहळ्याच्या समाप्तीच्या दिवशी, म्हणजेच अधिक ज्येष्ठ कृष्ण पक्ष, दर्श अमावस्या, रविवार दि. १४/०६/२०२६ रोजी एक अद्वितीय आध्यात्मिक पर्व साजरे होत आहे.
या पावन प्रसंगी मराठवाडा व विदर्भाच्या पुण्यभूमीतून आगमन होणाऱ्या अनेक महंत, साधू व संतांच्या प्रमुख उपस्थितीत "निज आत्मबोध" ग्रंथावर सत्संग, ज्ञानचर्चा व आध्यात्मिक चिंतन आयोजित करण्यात आले आहे. ह्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक श्री श्री श्री १००८ श्री महंत ज्ञानेश्वर भारती महाराज व दत्तभक्तांचे श्रद्धास्थान असलेले श्री संत शहापुरी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे.
संतांचा सहवास हा जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून आत्मज्ञानाचा प्रकाश देणारा असतो. संतवाणी, ज्ञानचर्चा आणि सत्संगातून भक्तांना जीवन जगण्याची योग्य दिशा, मनःशांती आणि अध्यात्माची खरी अनुभूती प्राप्त होते. या दिवशी उपस्थित सर्व महंत, साधू व संतांचा भावपूर्ण दिव्य सत्कार करण्यात येणार असून, संतसेवेचे पुण्य लाभण्याची ही दुर्मिळ संधी भाविकांना मिळणार आहे.संतांचे दर्शन, संतवाणीचे श्रवण आणि दत्तनामाचा गजर यामुळे जीवन धन्य होते. त्यामुळे सर्व दत्तभक्त, वारकरी, श्रद्धावान भाविक व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ज्ञानयज्ञाचा लाभ घ्यावा व आपल्या जीवनात अध्यात्माचा अमृतसंचय करावा, असे आवाहन ब्रम्हपुरी येथील श्री दत्त मठ सस्थांन समितीकडून करण्यात येत आहे.

0 Comments