Ticker

6/recent/ticker-posts

सामान्य कुटुंबातील तरुणाला उभारी देण्याचं कार्य आदरणीय प्रेरणास्थान श्री.विद्याधरजी महाले साहेब



 आई वडिलांनी जन्म दिला शिक्षण दिलं जगण्याचा संस्कार दिला पण सामाजिक जन्म देण्याचं काम माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील तरुणाला उभारी देण्याचं कार्य आदरणीय प्रेरणास्थान श्री.विद्याधरजी महाले साहेब (मुख्यमंत्री सचिव) यांनी केलं....

आदरणीय साहेबांचं नाव उच्चारताच सर्वसामान्य माणसाच्या तळागाळातील कार्यकर्त्याच्या अस्तित्वाभोवती सुरक्षिततेची तटबंदी निर्माण होते हा विश्वास आपल्या कार्यकृत्त्वातून साहेबांनी जनमानसात निर्माण केला,तरुणाची मोठ बांधून विकास कसा करावा या बाबतीत साहेबांचा हात कुणी धरू शकत नाही,एखादा काम करतो की फक्त दिखावा करतो हे साहेबांना सांगायची गरज नाही, उदार मन उदात्त देण्याची वृत्ती मनाचा मोठेपणा शत्रू तर नाहीच कुणी पण तो सुद्धा आला तर त्याला सुद्धा मदत मिळेलच हे मात्र नक्की...त्या बाबतीत आम्ही थोडे भाग्यशाली ठरलो साहेबांचं उदंड प्रेम आम्हा तरुणांना लाभलं लाभत आहे

महाराष्ट्राच्या समाजकारणातील पॉवर हाऊस असणाऱ्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या दालनात रुजू असलेले आमचे प्रेरणास्थान श्री.विद्याधर महाले साहेब,अशा महत्वाच्या पदावर विराजमान असणं आणि थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित असण आणि त्यात प्रशासकीय प्रमुख असण ही बाब जिल्ह्याच्या नशिबात पहिल्यांदा आली म्हणजे कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला एवढ्या महत्वाच्या पदांवर काम करता आले तो जिल्ह्यात पहिला मान मिळाला तो महाले साहेबांना, तोरणवाडा ते मंत्रालय हा प्रवास खडतर परिस्थितीत विद्वत्तेच्या जोरावर साहेबांनी पूर्ण केला एक बहुजन कुटुंबातून येऊन हा प्रवास पादाक्रांत करणे काय असते ते संबंधिताना कळेल...

तेव्हाचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब फुंडकरांचे खाजगी सचिव म्हणून मंत्रालयर एन्ट्री झाली होती त्यानंतर हेच पद विनोद तावडे साहेबांकडे सांभाळले 2014 ला भाजप सत्तेमध्ये आली मग साहेब सुभाष देशमुख साहेबांकडे आले नंतर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याकडे मग जेव्हा फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री बनले तेव्हा थेट त्यांची खाजगी सचिव म्हणून निवड आणि मग झंझावातला सुरुवात

गोरगरीब कष्टकरी आणि सामान्य कुटुंबातील होतकरू तरुण सोबत घेऊन आदरणीय साहेब विकासकामे जनसेवा करतात नवतरुणाना नेतृत्व सोपवतात ... जनमानसांच्या मनात आदरणीय साहेबांबद्दल जे प्रेम आहे ते अधिकाधिक द्विगुणित होत आहे,अरे तळागाळातील कार्यकर्ता मंत्रालयात जाऊन आपल्या माणसांची कामे करून आणतो, अडचण कुठलीही असो त्यावर उत्तर साहेब असत याचा कायम अभिमान असला पाहिजे..साहेब पक्ष जात पात धर्म कधी विचारत नाही गरजू पीडित आला की थेट कॉल करून समस्या निवारण करतात सामान्य माणसाच आशेच स्थान साहेब आहे ... पण काहीही झालं तरी साहेब अभेद्य राहतील आई रेणुका माता आणि सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद साहेबांसोबत आहे

अवघे जन मज लोकपाळ

धर्माला नीतीचे आणि निष्कपट भावनेचे अधिष्ठान देणारे एक आचारशील भक्त अक्षरश: सर्वस्व पणाला लावून सांस्कृतिक व सामाजिक अन्यायाच्या विरोधात दंड थोपटणारा एक आव्हानवीर योद्धा कर्तव्यदक्ष विकासाभिमुख प्रशासकीय कौशल्य या भूमिकांचा एकत्र मिलाफ झालेला लोककल्याणकारी महानुभाव... चिखलीला फुटलेली ताजी,टवटवीत विकासाची पालवी,आचार विचार सामान्यांच्या दृष्टीने निरामय,निरागस आदर्श ठरलेसामान्यांच्या जीवनातील नाना प्रकारच्या उत्कट कामांना अत्यंत आशयघन शब्दात साकार करणारा एक शब्दार्थप्रभू प्रतिभावंत...

एवढं असूनही काही माणसांचा साधेपणा डोळे दिपवून टाकणारा असतो,साधेपणा आणि प्रमाणिकपणा हे मानवी बौद्धिक मुकुटातील तेजस्वी अलंकार आहे...साधेपणा आणि सात्विक प्रवृत्तीच दर्शनच आम्हाला त्यांच्याकडे पाहून झालं माणसाच्या अंतःकरणातील माणुसकीच्या उद्दात भावना फुलवून त्याला मानव्याच्या उत्तुंग शिखरावर घेऊन जाणारे आणि दशकातून केव्हा तरीच घडणारे विकासाचे चमत्कार आदराचा विषय बनतात श्रद्धेचा विषय बनतात...

आपले सैन्य हे फक्त विकासाच्या प्रेरेणे वरचं नाही तर पोटावर सुद्घा चालते, हे छत्रपती नंतर ज्या काही लोकांना कळलं त्यापैकी एक ... घर कुटुंब शिक्षण व्यवसाय सर्व काही सांभाळा नंतर समाज सांभाळा अस आधुनिक युवकांना सांगणारा एक वैचारिक योद्धा

रुग्ण,शेतकरी,कष्टकरी विद्यार्थी माताभगिनी माय बाप जनतेला कुटुंब समजून यांच्या जीवनात काही बदल करता येईल का नवंचैतन्य निर्माण करता येईल का असा रांत्रदिवस विचार करणारा एक गतिशिल अधिकारी स्वतःच कुटुंब घेऊन तोऱ्यात मिरवता आल असत पण समजाचा देणं लागतो या उद्दात्त हेतूने त्यागाने समर्पणाने कार्य करणारा एक समाजाभिमुख व्यक्ती...असे उदयोन्मुख व्यक्तिमत्व आदरणीय विद्याधरजी महाले साहेब (खाजगी सचिव मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस)


आधी व्यवसाय शिक्षण नोकरी करा आणि मग उरलेल्या वेळेत समाजाच देणं लागतो म्हणून सामाजिक कार्य सुरू ठेवा हे सांगणारा फार कमी लोकांतील एक अधिकारीलढणाऱ्या सैनिकाला बळ द्यायचं असत त्याचे व त्याच्या कुटुंबाचे पोटापाण्याचे उदरनिर्वाहाचे प्रश्न मिटवायचे असतात हे छत्रपती शिवाजी महाराज नंतर ज्यांना उमजल त्या मोजक्या लोकांपैकी एक आदरणीय साहेब आपण आहात सलाम


आपलाच 

श्री.सोमेश सोपानराव इंगळे 

चंदनपूर ता. चिखली बुलढाणा 

Post a Comment

0 Comments