Ticker

6/recent/ticker-posts

"आठ दिवसांपासून नळ कोरडे; माहूरकरांचा संताप अनावर, घागर मोर्चाचा इशारा"



 श्रीक्षेत्र माहूर (अपील बेलखोडे): 

ऐन उन्हाळ्यात माहूर शहरातील पाणीपुरवठा मागील सात ते आठ दिवसांपासून ठप्प असल्याने नागरिकांना तीव्र हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. नळाला थेंबभरही पाणी नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

पाणीपुरवठा खंडित होण्यामागे कधी मोटार बिघाड, कधी व्हॉल्व्ह दुरुस्ती तर कधी पाईपलाईन गळती अशी कारणे नगरपंचायतीकडून दिली जात आहेत. मात्र वारंवार होणाऱ्या या समस्यांमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

विविध संघटना व नागरिकांनी अनेकदा आवाज उठवूनही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगरपंचायतीला शेवटचा इशारा देण्यात आला असून "दोन दिवसांत नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास घागर मोर्चा काढण्यात येईल," असा इशारा देण्यात आला आहे.

पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असल्याने माहूरकरांचा संताप वाढत असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments