जिंतूर- शंतनु कुलकर्णी तालुका प्रतिनिधी
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ.5 वी चे 3 विद्यार्थी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या (इ.8 वी चे 19 विद्यार्थी) निकालात जवाहर विद्यालयाचे 22 विद्यार्थी पात्र
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (इ.8 वी) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात तालुक्यात सर्वात जास्त पात्र विद्यार्थी जवाहर विद्यालयाचे आहेत. यात इ.5 वी चे 3 तर इ.8 वी चे 19 असे 22 विद्यार्थी पात्र झाले आहेत.
यात इ.5 वीचे पात्र विद्यार्थी १.कु.अस्मिता संतोष शेळके (160 गुण-प्रथम,२.कृष्णा सुरेश पव्हणे(138 गुण-द्वितीय), ३.कैवल्य अविनाश चवंडके(133 गुण-तृतीय) तर इ.8 वी चे पात्र विद्यार्थी १.पृथ्वीराज राजेश चव्हाण(208 गुण प्रथम), २.आदर्श विजय जाधव(206 गुण द्वितीय), ३.पद्माकर राजू घुगे (206 गुण तृतीय), ४.अभय श्रीनिवास अंभुरे (202 गुण चतुर्थ), ५.कु.मनस्वी अविनाश चवंडके(200 गुण), ६.शिवशंकर भगवान माकोडे (192 गुण), ७.कु.अवंतिका राजू चिभडे (188 गुण), ८.प्रद्युम्न गोपाळ कोकडवार (184 गुण),९.कु.धनश्री नरेश जिरवनकर(166 गुण), १०.स्वरित विजय संगेकर (166 गुण), ११.पार्थ महेश बुधवंत (160 गुण), १२.कु.आदिती शिवाजी सानप (158 गुण), १३.कु.मुग्धा लक्ष्मीकांत इटोलीकर (154 गुण), १४.कु.माही मुंजाभाऊ मोरे (150 गुण), १५.कु.श्रुती एकनाथ राऊत (144 गुण), १६.वेदांत गजानन मोरे (144 गुण), १७.प्रतिक जगन्नाथ बुधवंत (136 गुण), १८.प्रथमेश प्रदीप नालंदे(132 गुण), १९.कु.श्रुतिका संतोष आघाव (128 गुण) असे गुणवंत विद्यार्थी ठरले आहेत.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन *संस्थेचे सचिव तथा विद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री.खंडेराव वटाणे, प्राचार्य श्री.बळीराम वटाणे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी करून पुढील परीक्षांसाठी शुभेच्छा दिल्या तर या विद्यार्थ्यांना इ.5 वी चे विभागप्रमुख श्री.सुरेश खरात, श्री.व्ही.पी.राठोड श्री.व्ही.पी.सरोदे, श्री.व्ही.पी.रोकडे तर इ.8 वी चे विभागप्रमुख शंतनु कुलकर्णी, श्री.सुभाष अवसरमोल, श्री.कुंडलिक थोरात, श्री.रविकुमार देव्हडे यांनी मार्गदर्शन केले आहे.

0 Comments