Ticker

6/recent/ticker-posts

ओझर नगर परिषदेकडून शिवाजी चौक परिसरात स्पीड ब्रेकर



ओझर : ओझर नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ८ मधील शिवाजी चौक मेनरोड तसेच बाजारपेठ पोलीस चौकी परिसरात वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. विशेषतः भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे नागरिक, व्यापारी तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.

या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांकडून संबंधित ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची सातत्याने मागणी करण्यात येत होती. नागरिकांच्या भावना, तक्रारी व सुरक्षिततेचा मुद्दा लक्षात घेऊन अखेर संबंधित ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकण्यात आले आहेत.

यामुळे परिसरातील वाहतुकीवर नियंत्रण मिळण्यास मदत होणार असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.याबाबत प्रभाग क्रमांक ८ चे नगरसेवक रोहित निवृत्ती लभडे यांनी पुढाकार घेत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून काम पूर्ण करून घेतले.

Post a Comment

0 Comments