*अक्राणी प्रतिनिधी,वसंत पावरा*-
"गलत का खुलकर विरोध करो,चाहें राजनिती हो या समाज,इतिहास टकराने वालो का लिखा जाता है,तलवे चाटनेवालों का नही!"आदिवासी बांधवांनी पोलिसांचे दलाल व आदिवासी समाजाचे गद्दार लोकांपासून नेहमी लांब राहावं. हे दलाल व गद्दार आपल्या लोकांमधलेच असतात."हमें तो अपनो ने लूटा;गैरो में कहा दम था,मेरी कश्ती वहा डुबी ;जहा पानी कम था! "पोलिसांचे दलाल कशे ओळखायचे? ज्यांचा पोलिस ठाण्याशी व पोलिसांशी काही संबंध नसतांना जे लोक कायम पोलिस ठाण्यात दिसतात,नेहमी पोलिसांसोबत राहतात,कारण नसतांना पोलिसांसोबत फोटो काढतात,कायम पोलिसांची वाहवाह करतात,पोलिसांची नेहमीच चाटू गिरी करतात,चूकीच्या पोलिसांची बाजू घेतात, पोलिस ठाण्यात एखादी भानगड येण्याची वाट बघतात,खून, बलात्कार, मारामारी,दरोडा,चोरी, अपघात इत्यादी प्रकरणे तोडीपाणी करून, पैशांनी मिटवण्यासाठी प्रयत्न करतात किंवा पोलिसांच्या संगनमताने प्रकरणे दडपून टाकण्यास मदत करतात, आदिवासींना अमानुषपणे मारहाण, महिलांवर बलात्कार, मुलीवर अत्याचार, खून अशा प्रकरणात आदिवासींना साथ न देता आरोपींला साथ देतात,आदिवासी लोकांवर अन्याय झाल्यास आदिवासींची बाजू न घेता आरोपीची बाजू घेतात, आरोपींना वाचवण्यासाठी कामे करतात,एखादी भानगड पोलिस ठाण्यात येणार समजल्यावर तक्रारदाराला पोलिस ठाण्यात यायच्या अगोदरच आरोपीला मदत करण्यासाठी हजर राहतात, अशांना समजायचे पोलिसांचे दलाल.पोलिसांच्या दलालांचे पोलिसांशी आर्थिक हितसंबंध इतके मजबूत झालेले असतात की एखाद्या गरीब माणसावरील अत्याचाराच्या घटनेत दलालाने हात घातल्यास पोलिस सुद्धा तक्रार नोंदवून घेत नाहीत, तक्रार घेण्यास टाळाटाळ करतात.म्हणून सर्व पोलिस ठाणे हे दलाल मुक्त होणे गरजेचे आहे.
नंदुरबार येथे जय वळवी या आदिवासी तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ आदिवासी समाजाने काढलेल्या मूक मोर्चात पोलिसांची दलाली करणा-या अनेक दलालांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले नाहीत व त्यांना अटकही केले नाहीत,हे आपण उघड्या डोळ्यांनी बघितले आहे.उलट जे नेत्यांची व पोलिसांची दलाली करत नाहीत, पोलिसांच्या व आदिवासी गद्दार नेत्यांच्या, भूमाफियांच्या विरोधात बोलतात, आदिवासी समाजाच्या हितासाठी लढतात,अशा अनेक निरपराध सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे व बनावट गुन्हे दाखल करून पोलिसांनी रात्री बेरात्री अटक केली. प्रत्येक गावात पोलिसांचे दलाल व आदिवासींचे गद्दार लोक निर्माण झालेले आहेत, अनेक प्रकरणांतून हे दलाल व गद्दार लोक आपल्या समोर येतात,त्यांना आपण ओळखतो.हे दलाल व गद्दार नेहमीच आदिवासींवर होणा-या अन्याय अत्याचाराला बाधक ठरतात. म्हणून आपण यांच्या पासून लांबच राहिले पाहिजे.
आदिवासींचे गद्दार कशे ओळखायचे?आदिवासी समाजाच्या हितासाठी काम करणाऱ्या व हक्काचे रक्षण करणा-या व्यक्तींना विरोध करतात,त्यांचे पाय खेचतात.जे लोक आदिवासींचे जल, जंगल व जमीन यावरील हक्क अबाधित राखण्यासाठी काम करत नाहीत,जल, जंगल व जमीनचे संरक्षण करीत नाहीत,उलट परकियांना जमीन विकण्यास मदत करतात, भूमाफियांना मदत करतात,त्यांना आदिवासी समाजाचे गद्दार म्हणायचे.या गद्दारांमध्ये काही आदिवासी राजकीय नेतेही येतात.जे सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी करून आदिवासींच्या प्रश्नांवर मौन बाळगतात,चूप्पी साधतात, आदिवासींच्या विकासाला बाधक ठरतात,अडथडा निर्माण करतात त्यांना आदिवासी गद्दार नेते म्हणावे.आओ मिलकर अपने आदिवासी समाज को,समाज के गद्दार एवं दलालों से मुक्त करायें!अशी प्रतिक्रिया दलाल व गद्दारांबद्धल बिरसा फायटर्स़चे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.

0 Comments