नंदुरबार (प्रतिनिधी) मोईनोद्दीन शाह
मोजे काकर्दे, तालुका नंदुरबार येथे दिनांक १५ मे २०२६ रोजी राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमामध्ये एल निनोचा शेतीवर होणारा परिणाम, नैसर्गिक शेतीचे क्षेत्र वाढविणे, शेतीतील पाणी बचतीसाठी मूलस्थानी जलसंधारण व जलतारा संकल्पना तसेच नैसर्गिक निविष्ठांच्या स्थानिक उपलब्धतेसाठी BRC चा प्रभावी वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शेतकऱ्यांना वेस्ट डिकोम्पोझर व गो कृपा अमृत तयार करण्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक (Hands-on Training) देण्यात आले. तसेच पाणी फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकल्प संचालक आत्मा, नंदुरबार श्री. दीपक पटेल उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथील श्री. राजेंद्र दहातोंडे तसेच तालुका कृषी अधिकारी श्री. वैभव कोरडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी श्री. कुणाल ठाकुर, उप कृषी अधिकारी श्री. करणसिंग गिरासे, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. बागुल, सहायक कृषी अधिकारी श्री. मंदार पाटील, श्री. दीपक राजपूत, श्री. राहुल बत्तीसा, कृषी सखी सौ. छाया माळी, सौ. शोभा मराठे तसेच प्रगतशील शेतकरी श्री. देविदास रामदास माळी यांच्यासह गावातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये नैसर्गिक शेती, जलसंधारण आणि शाश्वत कृषी पद्धतींचा प्रसार करण्यावर विशेष भर देण्यात आला.

0 Comments