किल्ले धारूर:चेतन लोखंडे/
अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी सुजित वैरागे यांना नगरसेवक पदी उमेदवारी दिली होती.आणि ते पहिल्याच टर्ममध्ये प्रभाग क्रमांक १० मधून ५१९ मतांनी निवडून आलेले आहेत नुसतेच निवडून नाही तर कामाची यादी सुध्दा घेऊन आले आहेत प्रभाग क्रमांक १० मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून नाली चे काम रखडले होते.व नालीचे पाणी नागरिकांच्या घरात शिरत होते नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता मात्र याच कामाची दक्षता घेऊन नगरसेवक सुजित वैरागे यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे प्रत्येक घरोघरी नवीन नळ कनेक्शन दिले आहेत तसेच साठे नगर मध्ये नाली,रस्त्याचे काम पण लवकर पूर्ण होतील. काम करत आलोय काम करत राहू असे नगरसेवक सुजित वैरागे यांनी सांगितले आहे.

0 Comments