नंदुरबार (प्रतिनिधी) मोईनोद्दीन शाह
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात चिंचपाडा वन विभागाची मोठी कारवाई, 24 लाखाच्या ट्रकसह 4 लाख 25 हजार 124 रुपयाचा मुद्देमाल, एकूण 28 लाख 25 हजार 124 रुपयाचा मुद्देमाल चिंचपाडा वन विभागाच्या कारवाईत जप्त. नंदुरबार प्रादेशिक व वन्यजीव सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार दिनांक 15 मे 2026 रोजी वनउपच तपासणी नाका चौकी कोंडाबारी घाटात संशयित वाहन ट्रक GJ 17 XX 9955 थांबवीला असता, ट्रक यात लाकूड माल भरल्याचे दिसून आल्यावरून सदर खैर प्रजातीचे लाकूड मालाबाबत वाहतूक निर्गत परवाना विचारल्या वरून, वाहन चालक यांनी NTPS NOC तेलंगणा राज्य येथील दाखवली असता, सदर NTPS NOC ऑनलाईनला तपासणी केली असता, सदर NTPS NOC ऑनलाईन व वाहन चालक याच्याकडे असलेली NOC यामधे तफावत असल्याचे निदर्शनास आल्यावरून, वाहन चालक गाडी सोडून फरार झाला, सदर गाडी जप्त करून, शासकीय विक्री आगार नवापूर येथे आणून खाली करून मोजमाप घेतले असता, एकूण नग 862 असून, 19,502 घनमीटर खैर लाकूड माल मिळून आला, वाहनासह एकूण मुद्देमाल किंमत 28 लाख 25 हजार 124 रुपये असून प्रथम रिपोर्ट नंबर 02/2025 दिनांक 15 मे 2026 रोजी वनरक्षक सतिश पदमर तपासणी नाका चौकी यांनी वन गुन्हा जारी केला,
सदरची कार्यवाही धुळे वनसंरक्षक श्रीमती नीनू सोमराज, नंदुरबार उपवनसंरक्षक संतोष सस्ते, धुळे विभागीय अधिकारी दक्षता पथक राजेंद्र सदगीर, प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा, चिंचपाडा वनक्षेत्रपाल श्रीमती प्राशा पगार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे पुढील तपास वनपाल करीत आहे, सदरच्या कार्यवाहीत वनपाल सुजित बेडसे, युवराज भाबड, श्रीमती शितल तोरवने, वनरक्षक सतीश पदमर, जितेंद्र पवार, रामदास पावरा, देवमन सूर्यवंशी, अनिल वळवी, अमोल गावीत, राहुल गावीत, शिवराम गावीत, श्रीमती निताली गावीत, कायम वनमजूर, रोजनदारी वनमजूर, वाहचालक यांनी सहभाग नोंद केली आहे.

0 Comments