Ticker

6/recent/ticker-posts

दुःखाच्या अंधारात आशेचा किरण



नंदुरबार जिल्हा परिषदेकडून १० वारसांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती आदेशाचे वाटप !

(प्रतिनिधी) मोईनोद्दीन शाह

जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत सेवेत कार्यरत असतांना अकाली निधन झालेल्या वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या वारसांना अखेर हक्काचा रोजगार मिळाला आहे. त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार अनुकंपा नियुक्ती आदेशाचे वाटप आज दिनांक २१ मे २०२६ रोजी मा. श्री नमन गोयल(भाप्रसे) मुख्य कार्यकारी अधिकारी व मा. श्री. गणेश मोरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी(सामान्य) जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या हस्ते अत्यंत भावूक आणि आनंदी वातावरणात करण्यात आले.

संवर्गनिहाय नियुक्तीचा तपशील

एकूण १० वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार अनुकंपा नियुक्तीसाठी राखीव असलेल्या रिक्त पदांच्या 20 टक्के या प्रमाणात उपलब्ध रिक्त पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. यात अंगणवाडी पर्यवेक्षिका-01, ग्रामपंचायत अधिकारी-02, परिचर-05 व इतर संवर्गात-2 वारसांना नियुक्ती आदेश देण्यांत आले.

वारसांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा

नियुक्ती आदेश हाती पडताच वारसांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी प्रशासनाचे आभार मानत आनंद व्यक्त केला. याप्रसंगी बोलताना मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नमन गोयल यांनी सर्व नवनियुक्त कर्मचाऱ्यांचे स्वागत केले आणि त्यांना प्रामाणिकपणे सेवा बजावण्यासाठी प्रोत्साहित करत त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

0 Comments