Ticker

6/recent/ticker-posts

शिवसंवाद दौरा - घनसांवगी आणि परतुर-मंठा विधानसभा आढावा बैठक



‘शिवसंवाद दौऱ्या’ अंतर्गत घनसांवगी आणि परतुर-मंठा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी तसेच स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण संघटनात्मक आढावा बैठक खासदार डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथनिहाय तयारी, संघटन विस्तार, मतदार संपर्क अभियान आणि स्थानिक राजकीय परिस्थितीचा सखोल आढावा यावेळी घेण्यात आला.

बैठकीत बोलताना आमदार हिकमत दादा उढाण यांनी मतदारसंघातील विकासकामांचा आढावा घेत विविध महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती दिली. घनसांवगी एमआयडीसीसंदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, २० मे २०२६ रोजी एमआयडीसी मंजूर करण्यात आली असून महाराष्ट्र सरकारकडून एमआयडीसी अँक्ट १९६१ च्या कलम २०७ अंतर्गत आवश्यक अधिसूचना जाहीर करण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार असून युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच बळेगाव-आपेगाव ते कुंभार पिंपळगाव या ८५ किलोमीटरच्या महत्त्वपूर्ण रस्त्यासाठी २६१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती देत, सध्या डीपीआरचे काम सुरू असून जुलै अखेर किंवा ऑगस्ट महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याचबरोबर इंटरनॅशनल बँकेच्या मदतीतून सुखापुरी फाटा ते आंतरवाली टेंभी या २९ किलोमीटर रस्त्यालाही मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले. या रस्त्याचे सर्वेक्षण व टेंडर प्रक्रिया सुरू असून जुलै अखेर किंवा ऑगस्टच्या सुरुवातीस काम सुरू होणार आहे. तसेच आंतरवाली टेंभी ते मंगरूळ रस्ता आणि रामसगाव ते बानेगाव-भोगाव रस्त्यालाही मंजुरी मिळाल्याची माहिती देत संबंधित कामे लवकरच मार्गी लागणार असल्याचे आमदार साहेबांनी सांगितले.

संघटनात्मक बांधणीसंदर्भात बोलताना प्रत्येक गाव, गण आणि गटामध्ये शिवसेनेची ताकद अधिक भक्कम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. बीएलए, शाखाप्रमुख आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मतदार यादी पडताळणी, नवीन मतदार नोंदणी तसेच घराघरांपर्यंत संपर्क मोहिम अधिक प्रभावीपणे राबवावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

युवासेनेच्या माध्यमातून नवमतदार आणि युवा वर्गाशी सातत्याने संवाद वाढवणे, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्याने हाताळणे आणि त्यांना संघटनेच्या मुख्य प्रवाहात सक्रिय सहभागी करून घेण्यावर विशेष भर देण्यात आला. ग्रामीण भागातील विकासकामे, स्थानिक समस्या आणि जनतेच्या अपेक्षा यावरही पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या सूचना, अडचणी आणि आगामी निवडणुकांसंदर्भातील तयारी जाणून घेण्यात आली. आगामी काळात अधिक जोमाने आणि संघटितपणे काम करून घनसांवगी आणि परतुरमध्ये शिवसेनेची ताकद आणखी वाढवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी मंत्री संजय सिरसाट , माजी खासदार आनंद पराजंपे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संपर्कप्रमुख आनंद जाधव, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, जिल्हाप्रमुख ए. जे. पाटील बोराडे, शिवसेना तालुकाप्रमुख,उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments