Ticker

6/recent/ticker-posts

माधव निर्मळ यांनी माजलगाव मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत पंकजाताई मुंडे यांना निवेदन



किल्ले धारूर; चेतन लोखंडे 

लोकनेत्या तथा राज्याच्या मंत्री पंकजाताई मुंडे यांची मुंबई येथे भेट घेऊन माजलगाव मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले.भाजपाचे प्रमुख माधवराव निर्मळ यांनी हे निवेदन सादर करत मतदारसंघातील महत्त्वाच्या विकासकामांकडे लक्ष वेधले.यामध्ये किल्ले धारूर घाटाचे रुंदीकरण करून ११ किलोमीटर रस्ता करण्याची मागणी, किल्ले धारूर येथील एमएसईबी सबस्टेशनमध्ये ५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर बसविण्याची मागणी तसेच मोरफळी येथील पुलाचे बांधकाम तातडीने करण्याची मागणी करण्यात आली. या सर्व मागण्यांबाबत नामदार पंकजाताई मुंडे यांनी सकारात्मक भूमिका घेत स्वतः लक्ष घालून संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी मतदारसंघातील विकासकामांना वि गती देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. माजलगाव स मतदारसंघातील नागरिकांच्या क दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या मागण्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.


Post a Comment

0 Comments