*नंदुरबार (प्रतिनिधी) मोईनोद्दीन शाह* -
नंदुरबार जिल्ह्यात कृषी विभागाने चार ठिकाणी कारवाई करून प्रतिबंधित एचटीबीटी बियाणांचा एकूण ६ लाख रुपयांचा साठा जप्त केला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात प्रतिबंधित एचटीबीटी बियाणांची विक्री होत असल्याची माहिती कृषी विभागाला प्राप्त झाल्याने गेल्या दोन दिवसांत तपासणी मोहीम हाती घेण्यात आली. सदर कारवाई नंदुरबार, समशेरपूर, वाण्याविहीर व प्रकाशा येथे झाली. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबारातील तळोदा रस्त्यावरील चेतन पटेल व जितेंद्र पटेल यांच्यावर कारवाई करण्यात आली. अक्कलकुवा) येथे राजकुमार परदेशी यांच्यावर. प्रकाशा येथे योगेश लोहार, तर समशेरपूर (ता. नंदुरबार) येथे सुरेश हिरामण पाटील यांच्या शेतात ही कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, किशोर हडपे, उल्हास ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन देवरे, स्वप्नील शेळके जिल्हा, सुरेश साठे, प्रकाश खरमाळे, मोहनसिंग राजपूत, अभय कोर, विशाल वाकचौरे यांनी केली आहे.

0 Comments