धारूर (प्रतिनिधी)
मानवी हक्क अभियानचे धारूर तालुका अध्यक्ष किसन लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली तालुका बैठक घेण्यात आली.कर्मवीर एकनाथरावजी आव्हाड यांनी दिन -दलित - पेक्षित- वंचित घटकासाठी केलेले कार्य व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या माध्यमातून महिलांसाठी दिलेले अधिकार व हक्क हे कर्मवीर एकनाथराव आव्हाड यांनी पुढे कार्यरत केले.आणि तमाम महिलांच्या अधिकारासाठी लढा उभारला .आजही मानवी हक्क अभियान चे राष्ट्रीय अध्यक्ष व जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU) दिल्ली चे प्राध्यापक डॉ.मिलिंद आवाड हे वंचित -उपेक्षित घटकासाठी अहोरात्र काम करत आहेत.
आज महिलांच्या अनेक समस्या आहेत आणि या समस्या सोडवण्यासाठी मानवी हक्क अभियानच्या सक्रिय कार्यकर्त्या कल्पना पाटोळे व संध्या डोईफोडे सतत संघर्षशील असतात .महिलांच्या अधिकारासाठी नेहमी कार्यरत आहेत.त्यामुळे मा. डॉ. मिलिंद आव्हाड यांच्या आदेशाने आज सौ. कल्पना पाटोळे यांची महिला आघाडी तालुका अध्यक्ष व सौ संध्या डोईफोडे यांची महिला आघाडी तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.
या नियुक्ती कार्यक्रमासाठी बीड जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष श्री विष्णू मुजमुले ,जिल्हा उपाध्यक्ष महादेव उमाप ,जिल्हा सचिव परमेश्वर आडागळे ,ज्येष्ठ मार्गदर्शक व ता.उपाध्यक्ष हनुमंतजी अडागळे ,
सुरज लोखंडे, धारूर शहराध्यक्ष पवन डोईफोडे, सामाजिक कार्यकर्त्या कदम मामी, युवा कार्यकर्ते दादा लोखंडे युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष अशोक पाटोळे ,ज्येष्ठ मार्गदर्शक व कार्यकर्त्या सुनीता डोईफोडे रेखाताई पारवे ,केशव पाटोळे ,संगीता पाटोळे, करीना पाटोळे, संध्या पाटोळे ,रसिका पाटोळे ,पूजा गालफाडे, संगीता भोसले ,अविनाश पाटोळे, कुमार पाटोळे ,सुदर्शन पाटोळे, प्रदीप गालफाडे व अनेक कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.ता. अध्यक्ष किसन लोखंडे यांनी अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीची निवड केली असून धारूर तालुक्याचे मानवी हक्क अभियान चे ता. अध्यक्ष किसन लोखंडे व शहराध्यक्ष पवन डोईफोडे यांचे काम हे अतिशय जोमात सुरू आहे असे अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्याची व महिलांची भावना आहे त्यामुळे तालुका अध्यक्ष किसन लोखंडे यांचे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष व जिल्हा सचिव यांनी कामाचे कौतुक केले आहे.

0 Comments