Ticker

6/recent/ticker-posts

१ जून रोजी उमरीत छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती.



उमरी प्रतिनिधी धाराजी जोगदंड

दि. १ जून २०२६ सोमवार रोजी उमरीत  सर्जेराव गणेशराव ढगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. 

            छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन युवा उघोजक तरुणाचे ऑयडाल संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष सर्जेराव गणेशराव ढगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. शहरात शिवमय वातावरण तयार झाले आहे. 

        कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८.३० वा. उमरी मोंढा मैदान येथे ध्वजारोहणाने करण्यात येईल. नंतर ढोलताशांच्या गजरात भव्य दिव्य अशी छत्रपती संभाजी महाराज यांची मिरवणूक निघेल.  सायंकाळी ४  वा. गणिताचा कार्यक्रम होईल.

Post a Comment

0 Comments