*भरत गावीत यांच्या हस्ते शुभारंभ; १ कोटींच्या निधीतून उद्यान साकारणार*
नवापूर (प्रतिनिधी) पंकजा अहिरे -
नवापूर शहरातील मंगलदास पार्क येथे ‘अजित पवार नमो उद्यान’ या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरतभाऊ गावीत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून व भूमिपूजन करून करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष जयवंत जाधव, उपनगराध्यक्ष नरेंद्र नगराळे, बांधकाम सभापती भालचंद्र गावीत, पाणीपुरवठा सभापती शरद पाटील, आरोग्य सभापती सौ. मिनल अमृत लोहार, शहराध्यक्ष मनोहर नगराळे, नगरसेविका संगीता देसले, नगरसेवक धर्मेश पाटील, सीए वतन अग्रवाल, शिरीष प्रजापत, मनोहर गावीत, राजू आगळे, अविनाश वसावे, प्रा. विजय पाटील, प्रा. राजेंद्र पाठक, गोपाल उपासनी, दिलीप वळवी, सुधीर निकम, मनोहर चौधरी, भैय्या चौधरी, शितल ठाकरे, प्रतिभा दिदी, रविंद्र महिरे, कैलास माळी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भरतभाऊ गावीत यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या उद्यानासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. नवापूरमध्ये आधुनिक व आकर्षक उद्यान उभारण्यात येणार असून नागरिकांसाठी हे विरंगुळ्याचे ठिकाण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद सूर्यवंशी सर यांनी केले.

0 Comments