Ticker

6/recent/ticker-posts

किल्ले धारुरकरांचा घसा कोरडा; नगरपालिकेचा पाणीपुरवठा नेमका कधी सुरळीत होणार?



किल्ले धारूर: चेतन लोखंडे (दैनिक लोकयुवा)

ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर किल्ले धारूर शहरात पाणीप्रश्न गंभीर झाला असून, पाण्यासाठी नागरिकांना दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. 'नगरपालिका प्रशासन पाणीपुरवठा कधी सुरळीत करणार?' असा संतप्त सवाल आता शहरातील त्रस्त नागरिक विचारत आहेत. एकीकडे नळाला पाणी नाही आणि दुसरीकडे प्रशासनाकडून ठोस पाऊले उचलली जात नसल्याने

जनतेमध्ये मोठी नाराजी पसरली आहे आश्वासनांचा पाऊस, पण नळ कोरडेचः नगरपालिकेकडून वेळोवेळी दुरुस्तीची किंवा तांत्रिक कामाची कारणे दिली जातात. मात्र, प्रत्यक्षात नळाला पाणी येण्याचे दिवस लांबत चालले आहेत. केवळ आश्वासने देऊन जनतेची तहान भागत नाही, हे आता प्रशासनाने लक्षात घेण्याची वेळ आली आहे.

महिलांची पायपीट आणि आर्थिक फटका: पाणी नसल्यामुळे गृहिणींचे हाल होत असून, पहाटेपासूनच पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ज्यांची परिस्थिती आहे त्यांना खाजगी टँकरसाठी हजारो रुपये मोजावे लागत आहेत, तर गरीब

जनतेचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

प्रशासकीय ढिसाळ कारभार की नियोजनाचा अभाव ?: पाणीपुरवठा विस्कळीत होण्यामागे नेमके कारण काय ?नगर परिषद किल्ले धारूरजलवाहिन्यांची गळती आहे की पंपिंग स्टेशनमधील बिघाड ? याचे स्पष्टीकरण जनतेला मिळणे गरजेचे आहे. निदान 'या' तारखेपासून पाणी सुरळीत होईल, असा शब्द तरीप्रशासनाने द्यावा, अशी मागणी होत आहे.



Post a Comment

0 Comments