रुस्तम शेख यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :-
नेर तालुक्यात चिकणी (डोमगा ) येथे भीम तरुण उत्साही मंडळ, विशाखा महिला मंडळ, यशोधरा महिला मंडळ, जय गोविंद मित्र मंडळ, स्वराज मित्र मंडळ, श्री जगदंबा मंडळ व समस्त गावकरी मंडळी यांच्याद्वारे आयोजित 11 एप्रिल क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले ते १४ एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती यांच्या संयुक्त विद्यमानाने अतिशय शांततापूर्ण वातावरणात पार पडली आहे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती सुरुवात शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी नऊ वाजता पंचशील ध्वजारोहण व बुद्ध वंदनाने झाली. तसेच दिवसभर वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले त्याचबरोबर सुप्रसिद्ध गायक प्रा. जनार्दन गजभिये आणि त्यांचा संच पुसद यांचा भीम गीत गायनाचा सदाबहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी गावातील संपूर्ण बौद्ध उपासक आणि उपासिका यांच्याद्वारे लहान-मोठे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर, भीमगीत गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, डान्स, भाषण, प्रश्नमंजुषा इत्यादी. तिसऱ्या दिवशी संगीत खुर्ची, लिंबू चमचा स्पर्धा, व इतर कार्यक्रम तसेच पुढील सत्रामध्ये सत्कार समारंभ एक क्षण गौरवाचा साजरा करण्यात आला त्याचबरोबर सुप्रसिद्ध गायिका राणी पवार नागपूर यांचा दणदणीत भीम गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येऊन उपस्थित महिलांनी टाळ्यांची भरपूर दाद दिली. या कार्यक्रमाला सर्वांनी तन मन धनाने सहकार्य केले तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रमुख पाहुणे म्हणून मा. मोहनराव भोयर (प्रशिक्षण शिक्षण संस्था चिकणी डोमगा अध्यक्ष), मा. अमोल शेठ गणवीर (यवतमाळजिल्हा सामाजिक न्याय अध्यक्ष), वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशिक भोयर, गावचे सरपंच अमोल भाऊ निंबाळकर , गावचे पोलीस पाटील उमेशभाऊ मेश्राम , सौ. सुलोचना भोयर (जि. प.सदस्य माजी)तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष मनीष बनसोड, उपस्थित होते. यासोबतच मार्गदर्शक म्हणून, श्री प्रभाकर कापशिकर,श्री.हरिदासजी मेश्राम, महादेवराव घरडे, प्रा.राजकमल कापशिकर, सुहासभाऊ मडके, प्रा.सतीश मेश्राम, प्रणय घरडे, अंकुश धारकर, नितीन सुखदेवे, महेश भाऊ मेश्राम, प्रदीप भाऊ कापशीकर, सुनील गजभिये, मंगेश बोरकर, मिलिंद वासनिक, स्वप्निल देशभ्रतार, रवी देशभ्रतार,14 एप्रिल सकाळी नऊ वाजता बुद्ध वंदना व पंचशील झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले, 10 वाजता बाईक रॅली काढण्यात आली. संध्याकाळी भव्य मोठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची मिरवणूक संपूर्ण गावांमधून एकच काढण्यात आली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही वाचूनही साजरी करतो, आणि नाचूनही साजरी करतो असा गावकऱ्यांनी मोलाचा संदेश समस्त नागरिकांना दिला आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. प्रा. राजकुमार हरिदास मेश्राम व मा. सुग्रीव बांबोर्डे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकाश बनसोड व प्रद्यम्य शेंडे यांनी केले.

0 Comments