किल्ले धारूर: चेतन लोखंडे (दैनिक लोकयुवा)
भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालय व माननीय लोकनेत्या नामदार पंकजाताई साहेब मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार ६ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या घरावर भारतीय जनता पार्टीचा ध्वज लावून लोक उपयोगी कार्यक्रम राबवावेत हा दिवस उत्साहात साजरा करावा याचाच भाग म्हणून काही पदाधिकाऱ्यांना माजलगाव मतदार संघ प्रमुख माधव (तात्या) निर्मळ यांच्या हस्ते आज ध्वजाचे वाटप तसेच भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकऱ्यांना आव्हान करण्यात आले.
यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बाळासाहेब गायकवाड,नगरसेवक विनायक शिनगारे, राजू शेठ कोमटवार,बाळासाहेब खामकर, सरपंच शिवाजीराव काळे,तुकाराम शिनगारे स्वप्निल धनवडे व पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments