किल्ले धारूर: चेतन लोखंडे दैनिक लोकयुवा
संभाजी नगर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदाही मोठ्या उत्साहात व विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानिमित्ताने जयंती उत्सव समितीची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी कृष्णा वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
गुरुवारी आयोजित बैठकीत जयंती उत्सवाच्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रूपरेषा निश्चित करण्यात आली. जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले असून शहरातील भीमसैनिकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. नूतन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्षपदी सुमित पोटभरे, कार्याध्यक्षपदी महेश सिरसट, सचिवपदी अमोल सिरसट, सहसचिवपदी संजय जाधव तर कोषाध्यक्षपदी मनोज हजारे यांची निवड करण्यात आली आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक मंडळाचीही घोषणा करण्यात आली असून महादेव नाईकवाडे, उत्तरेश्वर जाधव, केशव नाईकवाडे, सतीश वाघमारे, महादेव पोटभरे, सुखदेव चापडे, संतोष लोखंडे, पिनू पोटभरे, बळीराम पोटभरे, खंडू पोटभरे, रघुनाथ सिरसट, बंडू सिरसट, शिवाजी सिरसट, मसाजी नाईकवाडे, सचिन हजारे आणि बन्सी भालेराव हे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच कार्यकारिणी सदस्य म्हणून श्रीकांत पोटभरे, अशोक पोटभरे, अरुण नाईकवाडे, भैया सिरसट, शुभम कांबळे, नितीन नाईकवाडे, गणेश वाघमारे, सुनील गायकवाड, रोहित नाईकवाडे, सागर मस्के, मुन्ना घोडके, दयानंद सरवदे, ऋतिक नाईकवाडे, अजय नाईकवाडे, सुरज पोटभरे, धीरज पोटभरे, तानाजी धोंगडे, राहुल शेवाळे आणि अनिकेत घुमरे यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आदर्शवत पद्धतीने साजरी करण्यासाठी सर्व नागरिकांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन नूतन अध्यक्ष कृष्णा वाघमारे व समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

0 Comments