Ticker

6/recent/ticker-posts

धार्मिक संस्कारांची जोपासना; डासाळा तरुणाकडून अखंड ज्ञानेश्वरी पारायण



गोपाळ गात प्रतिनिधी परभणी                 

   आजच्या धावपळीच्या आणि आधुनिक युगात तरुण पिढी पाश्चात्य संस्कृतीकडे वळत असतानाच, एका युवकाने अध्यात्माची वाट धरत 'ज्ञानेश्वरी' ग्रंथाचे पारायण पूर्ण करत आहेत त्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, ग्रामीण भागात धार्मिक संस्कारांची पाळेमुळे आजही घट्ट असल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

सेलू तालुक्यातील डासाळा येथील कृष्णा गजमल नागेश कदम युवकाने गेल्या काही दिवसांपासून हे पारायण सुरू केले होते. पहाटेच्या मंगलमय वातावरणात ग्रंथाचे वाचन आणि चिंतन करण्यात आले. या पारायणाची सांगता मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने करण्यात आली.

तरुणांपुढे एक आदर्शसध्याच्या काळात मोबाईल आणि सोशल मीडियाच्या विळख्यात अडकलेल्या तरुणाईला या युवकाने एक नवा मार्ग दाखवला आहे. मानसिक शांतता आणि संस्कारांसाठी अध्यात्म किती महत्त्वाचे आहे, हे त्याने आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. पारायणाच्या सांगतेप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिक आणि भाविकांनी उपस्थित राहून युवकाला आशीर्वाद दिले.

यावेळी बोलताना युवक म्हणाला की, "ज्ञानेश्वरी हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून तो जीवनाचे तत्वज्ञान सांगणारा ग्रंथ आहे. तरुण पिढीने आपल्या समृद्ध वारशाचे जतन करण्यासाठी अशा ग्रंथांचे वाचन करणे गरजेचे आहे."या धार्मिक कार्यामुळे परिसरात आनंदाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित युवकाचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.


Post a Comment

0 Comments