३५ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारास साथीदारासह अटक करून पुणे ग्रामीण हद्दीतील दोन व ठाणे शहर आयुक्तालयातील एक असे एकूण तीन खुनाचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश.केली असता, आरोपी ललित खोल्लम याचे एका महिलेसोबत सोबत प्रेमसंबंध होते, त्याकारणातून ती नेहमी त्याच्याकडे पैसे मागत होती, पैसे मागण्याचे कारणावरून त्यांचे नेहमी भांडण होत होते, त्यादरम्यान तिचा मुलगा देखील आरोपी ललित खोल्लम याचेकडे पैशाची मागणी करत होता. त्या गोष्टीचा राग आरोपी ललित खोल्लम याचे डोक्यात होता, प्रियसी महिला व तिचा मुलगा ठाणे येथे असताना दि.०७/११/२०२५ रोजी पैसे देतो अशी फुस लावून त्याने (मयत) श्रीकांत विलास वाडेकर वय २६ वर्षे मुळ रा. शिरोली ता. खेड जि पुणे यास खेड येथे बोलावून घेऊन त्याचे अपहरण केले आणि श्रीकांत वाडेकर यास शिरोली येथील फ्लॅट वर नेवून त्याचे डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून केला आणि आरोपी नंदलाल होले याचे मदतीने श्रीकांत वाडेकर याचा मृतदेह मंचर परिसरात नेवून जाळून टाकला व मृतदेहाची विल्हेवाट लावली. तसेच मयताची राख गोळा करून घोडनदीपात्रात सोडून दिली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. श्रीकांत वाडेकर याचे अपहरण करून त्याचा खून करणेत आला असल्याचे आरोपींनी कबुल केले असून त्याबाबतचा महात्मा फुले चौक, ठाणे शहर पो. स्टे. गु.र.नं. १२३९/२०२५ बी.एन.एस. १४० (२) प्रमाणे दाखल असून गुन्ह्यास बी.एन.एस. १०३ हे कलम वाढ झालेली आहे.
श्रीकांत वाडेकर याची आई रूपाली वाडेकर ही आरोपी ललित खोल्लम यास माझा मुलगा श्रीकांत कोठे आहे? असे वारंवार विचारत होती, आरोपी ललित खोल्लम सोबत भांडण करत होती, त्यामुळे आरोपी ललित खोल्लम याने तिला ठाणे येथून शिरोली येथे बोलावून घेतले आणि दि. १३/११/२०२५ रोजी तिचे शिरोली येथील फ्लॅटवर जावून (मयत) रूपाली विलास वाडेकर वय ४६ वर्षे रा. शिरोली ता. खेड जि. पुणे हिचे डोक्यात लोखंडी रॉड मारून तोंडावर व गळ्यावर चाकूने वार करून तिचा देखील खून केला असल्याचे सांगितले असून खेड पो स्टे गु.र.नं. ६३८/२०२५ बी.एन.एस. १०३ (१) प्रमाणे दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला आहे.
आरोपी ललित खोल्लम व नंदलाल होले यांनी रूपाली विलास वाडेकर रा. शिरोली ता. खेड हिचा खून केला असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना खेड पो स्टे गु.र.नं. ६३८/२०२५ बी.एन.एस. १०३ (१) या गुन्हयात वर्ग करून घेऊन अटक करणेत आलेली असून त्यांना मा. न्यायालयासमक्ष उपस्थित केले असता दि. १३/०४/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर करणेत आलेली आहे.
एकंदरीत आरोपींकडे केलेल्या सखोल कौशल्यपूर्ण तपासात आरोपींनी खेड पो.स्टे. ला दाखल असलेले ०२ खून, ठाणे शहर आयुक्तालय हद्दीत दाखल असलेला ०१ खून असे एकूण ०३ खुनाचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. तसेच आरोपी ललित खोल्लम याने फरार कालावधीत मध्यप्रदेश येथून दोन गावठी पिस्तुल व चार काडतुसे आणून विक्री केली होती, त्या अनुषंगाने कारवाई करून दोन गावठी पिस्तुल व चार काडतुसे हस्तगत करणेत आलेली आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल्ल, सो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, पुणे विभाग, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल मांडवे, खेड उपविभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुदर्शन राठोड, बारामती उपविभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बापुराव दडस, दौंड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, खेड पो स्टे चे पो.नि. सुभाष चव्हाण, स्था.गु.शा.चे सपोनि महादेव शेलार, सपोनि कुलदीप संकपाळ, वडगाव निंबाळकर पो.स्टे.चे सपोनि नागनाथ पाटील, स्था.गु.शा.चे पोसई अभिजीत सावंत, पोलीस अंमलदार दिपक साबळे, संदिप वारे, विक्रम तापकीर, हेमंत विरोळे, निलेश सुपेकर, अक्षय नवले, राजू मोमीण, अतुल डेरे, श्रेणी पोसई बाळासाहेब कारंडे, श्रेणी पोसई विनोद भोकरे, मंगेश थिगळे, भाऊसाहेब पुंड, अजय देडे, बाळासाहेब खडके, सचिन घाडगे, अजित भुजबळ, असिफ शेख, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, निलेश शिंदे, अजय घुले, राहूल पवार, रणजित कोंडके, खेड पो स्टे कडील पोसई श्रीकांत गोडगे, पोसई महेश गरड, श्रेणी पोसई शंकर भवारी, अंमलदार जिजाबापू बिडकर, सुदर्शन माताडे, महेश गोसावी, स्वप्निल लोहार, गोकुळ कोळी, संकेत कवडे, प्रविण आढारी, ऋषीकेश गोपतवाड, म.पो.कॉ. वैशाली कांबळे, वडगाव निंबाळकर पो स्टे चे अंमलदार पोपट नाळे, हृदयनाथ देवकर यांनी केली असून पुढील तपास खेड पोलीस स्टेशन करते आहे.

0 Comments