Ticker

6/recent/ticker-posts

शिर्डी लोकसभा आढावा बैठक व नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवकांचा सत्कार समारंभ.* 



शिवसेना उपनेत्या व शिर्डी लोकसभेच्या नवनियुक्त संपर्कप्रमुख मा. खासदार ज्योतीताई वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित शिवसेना पक्षाच्या आढावा बैठकीस शिर्डी येथे उपस्थित होतो. याप्रसंगी नव्याने निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला, तसेच पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी, कार्यकर्त्यांच्या बळकटीसाठी आणि आगामी राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी दिशा देणारी ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली.


या बैठकीत मा. खासदार ज्योतीताई वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनात्मक बांधणी, कार्यपद्धती आणि जनतेशी अधिक प्रभावी संपर्क कसा साधता येईल यावर मार्गदर्शन झाले. सर्वांच्या एकजुटीने आणि समन्वयातून शिवसेना पक्षाला अधिक बळ मिळणार असून, आगामी काळात जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याचा तसेच जनतेच्या सेवेसाठी आणि विकासाच्या कामांसाठी सर्वांनी एकदिलाने कार्यरत राहण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.


पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा उत्साह, निष्ठा आणि पक्षाप्रती असलेल्या समर्पणामुळे शिवसेना पक्ष भविष्यात आणखी बळकट होईल, असा विश्वास आहे. या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. कमलाकर कोते, श्री. नितीन औताडे, जिल्हा संघटक श्री. विठ्ठल घोरपडे यांच्यासह शिवसेना पक्षाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments