Ticker

6/recent/ticker-posts

त्रिशूल गावात महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार; परसबागेसाठी बियाण्यांचे वाटप


महिलांना लघुउद्योग सुरू करण्यासाठी मार्गदर्शन; आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल


दैनिक लोकयुवा धडगाव  प्रतिनिधी अर्जुन पावरा

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने त्रिशूल गावात महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेण्यात आला. यावेळी गावातील महिलांना परसबाग निर्मितीसाठी विविध प्रकारच्या बियाण्यांचे वाटप करण्यात आले.

केवळ परसबाग निर्मितीपुरते मर्यादित न राहता महिलांनी स्वतःचे लहान-मोठे व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, या उद्देशाने विशेष मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत महिलांना उपलब्ध व्यवसायाच्या संधी, व्यवसायाचे नियोजन, उत्पन्नाचे स्रोत आणि व्यवसाय सुरू करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

परसबागेच्या माध्यमातून कुटुंबाला ताज्या भाजीपाल्याची उपलब्धता होण्यास मदत होणार असून, लघुउद्योगांच्या माध्यमातून महिलांना उत्पन्नाचे साधन निर्माण करता येणार आहे.

महिलांच्या हाताला काम, कुटुंबाला आर्थिक बळ आणि गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. महिलांनी पुढाकार घेऊन विविध व्यवसायांत सहभागी व्हावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

Post a Comment

0 Comments